पाण्याअभावी नांदेडातील होंडाळा ग्रामस्थांचे स्थलांतर! 5 रुपये एक घागर – eNavakal
News महाराष्ट्र

पाण्याअभावी नांदेडातील होंडाळा ग्रामस्थांचे स्थलांतर! 5 रुपये एक घागर

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील होंडाळा येथे पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी 5 रुपयाला एक घागर खाजगी बोरचे पाणी विकत घ्यावे लागते तर गावाजवळील एका तलावातून अशुद्ध पाणी नळाद्वारे सोडले जाते़ तर 2 हजार 500 नागरिकांची टँकरच्या एकाच फेरीवर तहान भागवली जाते़ यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले असल्याचे विदारक चित्र होंडाळा गावात आहे. मुखेड तालुक्यातील जांब बु. बाजारपेठेजवळ असलेले होंडाळा हे गाव 2 हजार 500 लोकसंख्या असलेले व 400 पेक्षा जास्त कुटुंबसंख्या असलेले 9 ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेले मोठे गाव असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठा स्त्रोत नसल्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. 30 ते 35 वर्षापूर्वी शासकीय योजनेतून सांगवी बेनक शिवारातील तलावाच्या खाली विहीर खोदून पाणी पुरवठा केला जातो.आजही त्याच ठिकाणाहून 30 ते 35 वर्षांपासून पाणीपुरवठा गावाला केला जातो़ या सततच्या पाईपलाईन वापरामुळे ही पाईपलाईन कुचकामी झाली असून जागोजागी फुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते़.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More