पाणी भरण्याच्या वादातून महिलेचे कान कापले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

पाणी भरण्याच्या वादातून महिलेचे कान कापले

कोलार – देशात निवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. तर घराघरात पाणीबाणी. आता ही पाणीबाणी हातघाईवर आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील कोलारमध्ये पाणी भरण्याच्या वादातून एका महिलेचे चक्क कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून या महिलेचा शेजारच्या महिलेशी वाद झाला होता. तो वाद इतका विकोपाला गेला की, दोन दिवसांनी शेजारच्या पाच जणांनी महिलेवर हल्ला करून तिचे दोन्ही कान कापले. इंद्रायणी असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. कोलारच्या हूलकूर ग्रामपंचायतीत ही घटना घडली.
गावकर्‍यांनी केलेल्या नियमानुसार सार्वजनिक नळावर प्रत्येकजण चार बादल्या पाणी भरू शकतो. इंद्रायणी सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी असलेल्या यशोधामा यांनी चार बादल्या पाणी भरल्यानंतरही त्या आणखी पाणी भरत होत्या. त्यामुळे इंद्रायणी यांनी त्यांना हटकले. त्यानंतर रागाच्या भरात यशोधामा यांनी इंद्रायणी यांची बादली फेकून दिली. त्यामुळे त्या दोघींमध्ये वाद झाला. त्यावेळी गावकर्‍यांनी मध्यस्ती करून वाद सोडवला. त्यानंतर काल सकाळी इंद्रायणी गोठ्यातून घरी परतत असताना पाचजणांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचे दोन्ही कान कापले. या घटनेनंतर इंद्रायणीचा नवरा रघुपती याने यशोधामा यांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे यशोधामाच्या कुटुंबियांनी रघुपतीला मारहाण केली. त्यात त्यांच्या नाकाला दुखापत झाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More