पाणीपुरी विकून ‘तो’ बनला क्रिकेटर – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

पाणीपुरी विकून ‘तो’ बनला क्रिकेटर

मुंबई – वरिष्ठ संघापाठोपाठ भारताच्या युवा क्रिकेट संघाने आशिया चषक वनडे क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारताच्या युवा शिलेदारांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यात भारताने 3 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला. यात मुंबईकर यशस्वी जैस्वालचा खारीचा वाटा आहे. यशस्वी जैस्वालने 113 चेंडूंत 85 धावांच्या खेळीचा समावेश होता. मालिकावीर म्हणून गौरविण्यात आलेला यशस्वीने संपूर्ण स्पर्धेत यशस्वीने 79.50 च्या सरासरीने 318 धावा चोपल्या. यशस्वीचा भारतीय संघापर्यंतचा खडतर प्रवास सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

उत्तर प्रदेशच्या भदोही गावातून क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी यशस्वी जैस्वाल 2012 मध्ये तो अवघ्या 11व्या वर्षी मुंबईत त्याच्या काकांकडे आला. काकांचे घर लहान असल्यामुळे त्याला एका डेअरी दुकानात झोपावे लागायचे. क्रिकेटचा सराव केल्यानंतर तो थकायचा. एकदातर दुकान मालकाने त्याचे सर्व समान दुकानाबाहेर फेकून दिले. त्यानंतर काकांच्या विनंतीनंतर त्याला आझाद मैदानालगतच्या मुस्लिम युनायटेड क्लबच्या टेंटमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली.

एका मुलाखतीत त्याने सांगितले की, मुंबईकडूनच क्रिकेट खेळण्याच्या निर्धाराने मी येथे दाखल झालो. पण मी ज्या टेंटमध्ये मी राहत होतो. त्या टेंटमध्ये वीज आणि पाण्याची सोय. नव्हती. तर दोन वेळेच्या जेवणासाठी मी फळ विक्रेत्याकडे काम केले आणि रात्री पाणीपुरी विकली. हे करताना अनेकदा सोबत खेळणारे खेळाडू पाणीपुरी खायला यायचे, तेव्हा खूप वाईट वाटायचे. मात्र हे काम करणेही माझ्यासाठी गरजेचे असल्याचे त्याने सांगितले.

प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्यामुळे यशस्वीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 11-12 वर्षांचा असताना त्याची मी फलंदाजी पाहिली. आपल्यापेक्षा वरिष्ठ गोलंदाजांचाही तो मोठ्या खुबीने सामना करत होता. त्याच्या या कौशल्यानेच मला प्रभावित केले असे ज्वाला सिंग म्हणाले. त्याने 14 वर्षांखालील एका सामन्यात नाबाद 319 धावा केल्या होत्या आणि 13 विकेट्सही घेतल्या होत्या. त्यासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये यशस्वीच्या नावाची नोंद करण्यात आली. गाईल्स शिल्ड स्पर्धेत राजा शिवाजी विद्यामंदिर संघाविरुद्घच्या या खेळीने त्याला मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळवून दिले. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करून त्याने भारताच्या 19 वर्षांखालील संघातही स्थान पटकावले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर

इगतपुरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टात जामीन मंजूर करण्यात आले आहे. २००८ साली परप्रांतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची १ रुपयाही कर्जमाफी केली नाही, असे म्हणत ‘मोदी सरकार जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही नरेंद्र...
Read More