पाकिस्तान २९१ भारतीय मच्छीमारांची तुरुंगातून सुटका करणार – eNavakal
News गुन्हे विदेश

पाकिस्तान २९१ भारतीय मच्छीमारांची तुरुंगातून सुटका करणार

इस्लामाबाद – भारतीय मच्छीमारांची पाकिस्तान सुटका करणार असून पाकिस्तानच्या ताब्यात सध्या ५२७ भारतीय लोक आहेत. त्यापैकी येत्या २९ डिसेंबर व ८ जानेवारी रोजी भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात येणार आहे. अजाणतेपणी भारतीय मच्छीमारांनी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन मासेमारी केल्यामुळे त्यांना येथील तुरुंगात ठेवण्यात येते.

येत्या २९ डिसेंबर व ८ जानेवारी रोजी वाघा बॉर्डरवरून या मासेमारांना भारताच्या हद्दीत सोडण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या तुरुंगात वेगवेगळ्या देशांतील नऊशेहून अधिक कैदी असून त्यामध्ये ५२७ भारतीय कैदी आहेत. त्यांच्यावर दहशतवाद, तस्करी, खून आणि अन्य गुन्हे दाखल असल्याचे येथील अधिकारी फैजल मोहम्मद यांनी सांगितले आहे. २७ ऑक्टोबर रोजी ६८ मासेमारांना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हद्द ओलांडल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. मच्छीमारांकडे आधुनिक उपकरणं नसतात तसंच त्यांच्या होड्या लाकडाच्या व लहान असल्याने त्यांना आंतराराष्ट्रीय सीमेचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा घटना होत असतात.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश मुंबई

पेट्रोल-डिझेल आजही महागले; पाहा आजचे दर

मुंबई – सौदी अरबमध्ये झालेल्या हल्यांनंतर जगभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. देशात आजही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर २९...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन चिदंबरमना भेटले

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार कारागृहात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More