पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 60 टक्के भरपाई द्यावी लागणार; आयसीसीचा आदेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 60 टक्के भरपाई द्यावी लागणार; आयसीसीचा आदेश

दुबई – आयसीसीच्या तंटा निवारण समितीने आज पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयला नुकसानभरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानला या नुकसानभरपाई प्रकरणी बीसीसीआयने मागितलेल्या रकमेच्या 60 टक्के रक्कम द्यावे लागणार आहेत. आयसीसीच्या तंटा निवारण समितीने आज हा निर्णय दिला. या समितीत बीसीसीआयने पीसीबीविरोधात प्रकरण लढण्यासाठी झालेल्या 15 कोटी रुपयांच्या खर्चाची मागणी केली होती. बीसीसीआयने पत्र लिहून पीसीबीकडून 15 कोटी रुपये वसूल करण्याची मागणी केली होती.

आयसीसीने सांगितले की, समितीने पीसीबीला नुकसानभरपाई, प्रशासनिक खर्चाच्या 60 टक्के नुकसानभरपाई बीसीसीआयला देण्याचा आदेश दिला आहे. समितीचा हा निर्णय बंधनकारक आहे. तर दुसरीकडे समितीने बीसीसीआयला देखील प्रशासनिक खर्चाच्या ४० टक्के भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयात भारतीय क्रिकेट बोर्डाने दावा केलेल्या रकमेचा उल्लेख नाही. पीसीबीने बीसीसीआयने आरोप लावला होता की, पाकिस्तानी क्रिकेट संघासोबत भारतीय क्रिकेट संघ सिरीज खेळत नसल्याने पाकिस्तानला अनेक कोटींचे नुकसान झाले आहे. याचीच नुकसानभरपाई बीसीसीआयने करावी अशी मागणी पीसीबीने केली होती. आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली होती.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More