पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या कारला भीषण अपघात – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या क्रीडा

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या कारला भीषण अपघात

लाहोर – भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा पती आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्या कारला रविवारी रात्री भीषण अपघात झाला. यात सुदैवाने शोएबला फार दुखापत झाली नाही, मात्र त्याच्या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची कार रस्त्याशेजारी असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. यात कारच्या पूर्णपणे चिंधड्या उडाल्या. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या ड्राफ्ट इव्हेंटसाठी शोएबने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून घरी परतताना लाहोरमध्ये त्याच्या कारची एका मोठ्या वाहनाला धडक बसली आणि अपघात झाला.

पीएसएलच्या सहाव्या हंगामासाठी ड्राफ्ट इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यात शोएबला पेशावर जल्मी संघाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले. या इव्हेंटनंतर शोएब त्याची आलिशान स्पोर्ट्स कार घेऊन निघाला. परंतु लाहोरच्या रस्त्यावर त्याच्या स्पोर्ट्स कारची एका ट्रकला धडक बसली. सुदैवाने यात शोएबला फारशी इजा झाली नाही, परंतु स्पोर्ट्स कारचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला.

मिळालेल्या माहितीनुसार, आपला सहकारी वहाब रियाज याच्या कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना शोएबचा कारवरील ताबा सुटला. मलिकने कारचा अपघात होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केला पण भरधाव वेगात असलेली स्पोर्ट्स कार थेट जाऊन समोरच्या ट्रकवर आदळली. एका हॉटेलबाहेर ट्रक पार्क करण्यात आला होता. त्या ट्रकला कारने धडक दिली.

दरम्यान, या अपघातानंतर मलिकने ट्विट करून आपण सुखरूप असल्याचे चाहत्यांना सांगितले. ‘मी साऱ्यांना सांगू इच्छितो की मी सुखरूप आहे. माझ्या कारला अपघात झाला असला तरी त्यात मला दुखापत झालेली नाही. देवानेच मला यातून वाचवलं. माझ्या तब्येतीची चौकशी करणाऱ्या साऱ्यांना धन्यवाद. तुमचं माझ्यावरील प्रेम आणि काळजी पाहून मला आनंद झाला’, असं ट्विट त्याने केलं आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखा किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी आणा – CAIT

नवी दिल्ली – किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders)ने सरकारला इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर बंदी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 16,311 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,04,66,595 वर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच देशात...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या क्रीडा

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या कारला भीषण अपघात

लाहोर – भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा पती आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्या कारला रविवारी रात्री भीषण अपघात झाला. यात सुदैवाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्र अलर्टवर; परभणीत 800 कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू

परभणी – महाराष्ट्रातील मांसाहारप्रेमींसाठी एक चिंताजनक बातमी आहे. देशातील 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा पैलाव आढळून आल्यानंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश विदेश

चिंताजनक! दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनाचे नवी मुंबईत ३ रुग्ण

मुंबई – ब्रिटनपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाही महाराष्ट्रात दाखल झाला आहे. खारघरमधील टाटा मेमोरिअलमध्ये दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. तीन रुग्णांपैकी एक...
Read More