पाकिस्तानी अभिनेत्री रेश्माची पतीकडून हत्त्या – eNavakal
गुन्हे मनोरंजन

पाकिस्तानी अभिनेत्री रेश्माची पतीकडून हत्त्या

खैबर पख्तूनख्वा – पाकिस्तानी अभिनेत्रींसह हिंसा होण्याच्या घटना सतत घडत असतात. गायिका आणि अभिनेत्री रेश्मा हिची हत्त्या करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे तिच्या नवऱ्यानेच तिच्यावर गोळी झाडून हत्त्या केली. तिचा नवरा फैदा खानसोबत तिचे संबंध काही काळापासून बिघडले होते. त्यांच्यात वारंवार वाद होत असत. त्यामुळे रेश्मा पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वांच्या नौशेरा जिल्ह्यात तिच्या भावासह राहत होती. रेश्मा फैदा खानची चौथी पत्नी होती. तो विदेशात काम करत असून काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानात आला होता.

फैदा बुधवारी रेश्माला सासरी न्यायला तिच्या घरी आला होता. परंतु रेश्माने त्याच्यासह जाण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि फैदाने रेश्मावर गोळी झाडली. पोलिसांमध्ये या घटनेची तक्रार केली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये अभिनेत्रीची हत्त्या करण्यात आल्याची ही तब्बल पंधरावी घटना आहे. यापूर्वी ३ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री सनबुलची गोळी झाडून हत्त्या करण्यात आली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More