पाकिस्तानात 25 जुलैला होणार सार्वत्रिक निवडणुका – eNavakal
News निवडणूक विदेश

पाकिस्तानात 25 जुलैला होणार सार्वत्रिक निवडणुका

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने सुचवलेल्या 25 ते 27 जुलै या तारखेतील 25 जुलै या तारखेवर राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी मोहर लावली आहे. 25 जुलैला नॅशनल असेंब्लीसोबतच पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान प्रांताच्या विधानसभांसाठीही निवडणुका होणार आहेत. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ 31 मे रोजी संपणार आहे. तर विधानसभांचा कार्यकाळ 28 मे रोजी समाप्त होणार आहे.
पाकिस्तानी संविधानानुसार, कार्यकाळ संपण्याच्या 48 तासांच्या आत सरकार स्थापन करावे लागते. तसे न झाल्यास 48 तासानंतरच्या कालावधीत वाढ केली जाते. तसेच 60 दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. पण, अद्याप सरकार आणि विपक्षांमध्ये 2 जूनपर्यंत सरकार स्थापन होऊ शकत नाही. 27 जुलैला जुम्मा (शुक्रवार) असल्याने निवडणूक आयोगाने ती तारीख मंजूर केली नाही. अनेकांनी शुक्रवारी मतदान होण्यावर आक्षेप घेतला होता. कारण, शुक्रवारी नमाजमुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More