पाकिस्तानात महागाईचा भडका; दूध दर १४० रुपये लिटर – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

पाकिस्तानात महागाईचा भडका; दूध दर १४० रुपये लिटर

कराची – जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने पाकिस्तानची जनता अक्षरश: बेहाल झाली आहे. याठिकाणी टोमॅटो, भाज्यांनंतर आता दुधाच्या दरानेही महागाईचे टोक गाठले आहे. पाकिस्तानातील कराची आणि सिंध या सर्वात मोठ्या भागांमध्ये दुध प्रति लिटर एकशे चाळीस रुपये दराने विकले जात आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेला दररोज दूध पिणे न परवडणारे झाले आहे. सिंध सरकारने याबाबत दखल घेत १३ सप्टेंबर रोजी दुग्धशाळा मालकांची बैठक बोलावली आहे.

दरम्यान, पाकिस्तानात मोहरम हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी घरोघरी दुधाचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे या काळात दुधाला अधिक मागणी असते. याचाच फायदा घेऊन दूध विक्रेत्यांनी मनाप्रमाणे दर अव्वाच्या सव्वा वाढवल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तसेच या सर्व प्रकाराकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

पाकिस्तानी सरकारने एक लिटर दुधाची किंमत ९४ रुपये इतकी जाहीर केली आहे, मात्र देशाच्या कोणत्याही भागात शंभर रुपयाहून कमी दरात दूध विक्री केली जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत ५२४ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना रुग्णांनी पुन्हा ५०० चा आकडा ओलांडला असून आज ५२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा...
Read More
post-image
देश

तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण

मुंबई – तळोजा तुरुंगात असलेले वरावरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाढदिवसासाठी महत्त्वाची घोषणा

मुंबई – राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी, भारताची मागणी मान्य

नवी दिल्ली – भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार भारतीय उच्चायोगाचे...
Read More