पाकिस्तानात पोलिओ पथकावर दहशतवादी हल्ला, दोघांचा मृत्यू – eNavakal
News दहशतवादी हल्ला विदेश

पाकिस्तानात पोलिओ पथकावर दहशतवादी हल्ला, दोघांचा मृत्यू

लाहोर – पाकिस्तानच्या आदिवासी बहुल भागात दहशतवाद्यांनी पोलिओ लसिकरणासाठी आलेल्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलिओ पथकातील 2 सदस्यांचा मृत्यू झाला. तसेच इतर 3 जणांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. उर्वरीत दोन सदस्यांनी घटनास्थळावरून पसार होऊन आपला जीव वाचवला. तसेच पोलिस मुख्यालयात जाऊन या हल्ल्याची माहिती दिली.
सफी तहसीलात पोलिओ लस देण्यासाठी 7 सदस्यांचा एक समूह आला होता. त्यांच्यावरच दहशतवाद्यांनी हल्ला केला. पाकिस्तानात पोलिओ मोहिमेसाठी आलेल्या कर्मचार्‍यांवर हल्ले होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांना दहशतवादी नेहमीच लक्ष्य करतात. गेल्या महिन्यातच कराचीत सुद्धा अशाच प्रकारचा हल्ला झाला.
कराची, पेशावरसह समस्त पाकिस्तानात पोलिओ पथकांवर हल्ल्याचे प्रकार घडतात. दहशतवादी आणि स्थानिक संस्था संघटनांनी पोलिओ पथकांबद्दल अफवा पसरवल्या आहेत. पोलिओ पथक पाकिस्तान आणि एकूण मुस्लिम समाजाची नसबंदी करण्यासाठी पोलिओचा बहाणा करतात. हा एक आंतरराष्ट्रीय कट असल्याचे सांगत स्थानिकांनाही भडकावले जाते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More