पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत केंद्र सरकारने धोरण ठरवावे – बीसीसीआय – eNavakal
क्रीडा देश

पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत केंद्र सरकारने धोरण ठरवावे – बीसीसीआय

नवी दिल्ली – पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येणार्‍या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने त्यांच्यासोबत क्रिकेट मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला. २०१२ सालापासून या दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही; पण आयसीसीच्या नियमानुसार प्रत्येक देशाने होम व अवे पद्धतीने क्रिकेट मालिका खेळणे अनिवार्य असल्यामुळे बीसीसीआयने केंद्र सरकारकडे पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत धोरण ठरवावे अशी मागणी केली आहे. बीसीसीआयकडून पहिल्यांदाच केंद्र सरकारला अशाप्रकारे विचारणा करण्यात आलेली आहे.

भारताचा संघ आयसीसीकडून आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप यांसारख्या स्पर्धांमध्ये खेळतो; पण दोन देशांमधील द्विपक्षीय मालिका २०१२ सालापासून झालेली नाही. यावेळी भारत व पाकिस्तान यांनी त्रयस्थ ठिकाणी क्रिकेट मालिका खेळावी का, असेही बीसीसीआयकडून विचारण्यात आलेले आहे.

नुकसानभरपाईच्या मागणीमुळे…
भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये २०१४ साली द्विपक्षीय मालिका खेळण्याचा करार झाला होता. मात्र भारताने या दरम्यान एकही मालिका खेळली नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ७० मिलियन अमेरिकन डॉलर्सची नुकसानभरपाई बीसीसीआयकडून मागितली. बीसीसीआयने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या या पावलाकडे गांभीर्याने बघितले नसले तरी भविष्यात विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून केंद्र सरकारला धोरणाबाबतची मागणी केली असावी. दरम्यान, दोन देशांमधील तणावपूर्ण वातावरणाकडे बघता आयसीसीही बॅकफूटवर गेलीय. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी तेही प्रयत्न करताहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
मुंबई

वॉकहार्ट रुग्णालयातील 3 डॉक्टरसह २६ नर्सना कोरोनाची झाली लागण

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई सेन्ट्रल परिसरात असलेल्या वॉकहार्ट रुग्णालयातील ३ डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सना कोरोनाची लागण झाली आहे....
Read More