पाकिस्तानशी आर्थिक व व्यापारी संबंध तोडले! मग 2000 टन कांदा का आयात करता? – eNavakal
News देश

पाकिस्तानशी आर्थिक व व्यापारी संबंध तोडले! मग 2000 टन कांदा का आयात करता?

मुंबई – भारताविरोधात दहशतवादी व घातपाती युद्ध पुकारलेल्या पाकिस्तानबरोबरचे आर्थिक व व्यापारी संबंध भारत सरकारने तोडले असतानाही केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कांद्याच्या किंमती वाढून मतदार नाराज होऊ नये म्हणून भारत सरकार पाकिस्तानातून 2000 टन कांदा आयात करणार आहे. त्यामुळे महाराट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येणार आहे.
भारताच्या एमएमटीसी (मेटल अ‍ॅण्ड मिनरल ट्रेड कॉर्पोरेशन)ने पाकिस्तानकडून 2000 टन कांद्याची आयात करण्याची निविदा पाठविली आहे. हा पाकिस्तानी कांदा नोव्हेंबर महिन्यात भारतात येणार आहे. त्याचवेळी दिवाळीनंतर भारतात खरीप हंगामातील कांद्याची कापणी होऊन हा कांदा बाजारात येईल. त्यामुळे पाकिस्तान व भारताचा कांदा एकाचवेळी बाजारात आल्याने कांद्याचा भाव पडणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यांत अश्रू येणार आहेत.
सध्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा भाव प्रतिक्विंटल 2300 रुपये आहे. ग्राहकांना हा कांदा 39 ते 42 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आणखी भाव वाढले तर मतदार नाराज होतील ही भीती भाजपा सरकारला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून 2000 टन कांदा मागविण्यात आला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More