पाकिस्तानला लुटणार्‍यांना सोडणार नाही-पंतप्रधान इम्रान खान यांचा इशारा – eNavakal
News विदेश

पाकिस्तानला लुटणार्‍यांना सोडणार नाही-पंतप्रधान इम्रान खान यांचा इशारा

इस्लामाबाद – पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर बनला आहे. गेल्या दहा वर्षात देशावर 24,000 अब्ज रुपयांचे कर्ज झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी व पंजाब प्रांताचे विरोधी पक्षनेते हम्जा शहजाद यांना अटक केली आहे. माजी पंतप्रधान नवाज शऱीफ तुरुंगातच आहेत. त्यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टी व पाकिस्तान मुस्लीम लीगने आंदोलन सुरू केले आहे. त्यावर इम्रान खान म्हणाले,‘आंदोलन करून मला ‘ब्लॅकमेल’करू नका मी घाबरणार नाही.

इम्रान खान यांनी इशारा दिला की, माझे प्राण गेले तरी बेहत्तर मी या देशाला लुटणार्‍या चोरांना सोडणार नाही. इम्रान खान यांनी भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. त्यामध्ये फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, इंटेलिजन्स ब्युरो, आयएसआय संचालक, फेडरल बोर्ड रेव्हेन्यू, सेक्युरिटी अ‍ॅण्ड एक्स्चेंज कमिशन ऑफ पाकिस्तान या महत्वाच्या संस्थांचा समावेश आहे.
पाकिस्तान पिपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग यांची इम्रान खान यांच्यापूर्वी 10 वर्षे सत्ता होती. नवाज शरीफ व नंतर त्यांचा भाऊ पंतप्रधान होते. याचकाळात 24,000 अब्ज रुपयांचे कर्ज झाले. देश दिवाळखोरीत गेला, देशात बेकारी वाढली आहे. ज्या भ्रष्टाचार्‍यांना कधी अटक होणार नाही, असे वाटत होते ते आता गजाआड गेले आहेत. आता ते मला आंदोलन करून घाबरवीत आहेत. मात्र मी मेलो तरी बेहत्तर, मी ही भ्रष्टाचाराची कीड नाहीशी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आज इम्रान खान यांनी दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More