पाकिस्तानला नमवून इंग्लंडचा मालिका विजय – eNavakal
News क्रीडा विदेश

पाकिस्तानला नमवून इंग्लंडचा मालिका विजय

ट्रेण्डब्रिज – नुकतीच जन्मलेली मुलगी आजारी असल्यामुळे हॉस्पीटलमध्ये रात्री घालवली. झोपही पुरेशी मिळाली नाही. तरीही क्रिकेटच्या रणांगणात झंझावाती फलंदाजी करीत पाकिस्तानचा पालापाचोळा केला. ही स्टोरी इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याची. त्यांच्या 89 चेंडूंतील 114 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने शुक्रवारी झालेल्या चौथ्या वन डे लढतीत पाकिस्तानवर तीन गडी व तीन चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. जेसन रॉय याचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. पाकिस्तानकडून मिळालेल्या 341 धावांचा पाठलाग करणार्‍या इंग्लंडने सात गडी राखून विजय संपादन केला. जेसन रॉय व जेम्स विन्स या सलामीवीरांनी 94 धावांची भागीदारी करीत इंग्लंडला आश्वासक सुरूवात करून दिली. जेम्स विन्स 43 धावांवर बाद झाला. पण जेसन रॉयने आपल्या खेळीत चार सणसणीत षटकार व 11 चौकारांची बरसात केली. जो रूटनेही 36 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने नाबाद 71 धावांची खेळी करीत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानकडून इमाद वासीम व मोहम्मद हसनैन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 7 बाद 340 धावा करताना इंग्लंडच्या गोलंदाजांवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले. फखर जमानने 57 धावांची, बाबर आझमने 115 धावांची, मोहम्मद हाफीजने 59 धावांची आणि शोएब मलिकने 41 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून टॉम करणनने 75 धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More