पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे अमेरिकेने विमानतळावर कपडे उतरवले – eNavakal
विदेश

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे अमेरिकेने विमानतळावर कपडे उतरवले

न्यूयॉर्क – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अमेरिकेतील जॉन एफ कॅनेडी एअरपोर्टवर कडेकोट सुरक्षा तपासणीतून जावे लागले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना तपासणीदरम्यान त्यांना अपमानकारक वागणुकींचा सामना करावा लागला असल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रम्प सरकारकडून पाकिस्तानवर व्हिसा बंदी लागू करण्याचे विचारविनिमय सुरू असताना हा व्हिडीओ समोर आला आहे. एकीकडे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडत असताना पंतप्रधान अब्बासी यांना अपमानाकारक वागणूक मिळाल्याने पाकिस्तानी जनतेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये जॉन एफ कॅनेडी एअरपोर्टवर पाक पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांची सर्वसामान्य जनतेप्रमाणे कपडे उतरवून तपासणी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्यानुसार देशाच्या पंतप्रधानांकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट असतो. तसेच खासगी दौऱ्यामध्ये अशापद्धतीने तपासणी होणे हा देशाचा अपमान आहे.

दरम्यान, पाक पंतप्रधान अब्बासी आपल्या आजारी बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. यावेळी त्यांनी अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचीही भेट घेतली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More
post-image
News मुंबई

धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ

मुंबई  – मुंबई पालिकेने आता आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसा प्रस्ताव तयार करून...
Read More