पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी – eNavakal
गुन्हे न्यायालय विदेश

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

इस्लामाबाद :
बहुचर्चित पनामागेटप्रकरणी दोषी ठरवत पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आल्यानंतरही नवाज शरीफ यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. पनामा पेपर्स प्रकरणी नवाज शरीफ यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. या वृत्ताला त्यांच्या वकिलांने दुजोरा दिला आहे. नवाज शरीफ सध्या लंडनमध्ये पत्नीसोबत आहेत. त्यांची पत्नी कुलसुम नवाज कर्करोगाशी लढा देत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
28 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने पनामागेटप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दोषी ठरवत पंतप्रधान पदावरुन हटवले. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं. न्यायालयाच्या निर्णयानंतर नवाज शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार झाले. त्यानतंर काही दिवसात नवाज शरीफ हे लंडनला गेले आणि तेव्हापासून ते तिथेच आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये मुसळधार; अनेक रस्ते पाण्याखाली

मुंबई – मुंबई उपनगरासह परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी वाहतूककोंडी होण्यासही...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More