पाकिस्तानची १८२ मदरशांवर कारवाई – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

पाकिस्तानची १८२ मदरशांवर कारवाई

इस्लामाबाद – जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानने १८२ मदरशांवर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या १२१ जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

पाकिस्तान सरकारकडून गुरुवारी सांगण्यात आले की, दहशतवाद्यांविरोधात कारवाईत करण्यात येत आहे. पाकिस्तानमधील विविध राज्यांमध्ये कारवाई करत सरकारने १८२ मदरसे ताब्यात घेण्यात आले आहेत. या मदरशांचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशय आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी कारवाई करत १२१ ताब्यात घेतलंय, अशी माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने एक पत्रक जारी करत दिलीय. तर दहशतवाद्यांविरोधातील ही कारवाई पूर्वनियोजित होती. भारताने टाकलेल्या दबावातून पाकिस्तानने ही कारवाई केलेली नाही, असं पाकच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More