‘पाक’कडे दहशतवाद्यांशी लढायची ताकद नसेल, तर भारत मदत करेल – गृहमंत्री – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

‘पाक’कडे दहशतवाद्यांशी लढायची ताकद नसेल, तर भारत मदत करेल – गृहमंत्री

जयपूर – जयपूरमधल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतामधील सुधारलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर विधान केले. त्याचबरोबर पाकिस्तान देशाला जर दहशतवादी विरोधात कारवाई करता येत नसेल तर त्यांनी भारताची मदत घ्यावी, असा टोला राजनाथ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना लगावला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या चार वर्षांत देशाची सुरक्षा तगडी बनली आहे, या सरकारच्या वेळी देशात कोणताच मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही, त्याचबरोबर नक्षलवादी हल्ले तब्बल 50-60 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे या सरकारच्या कालावधीमध्ये भारताने देशाला चारी बाजूने सुरक्षित बनवले असल्याची माहिती, राजनाथ यांनी पत्रकारांना दिली.

पत्रकारांशी बोलताना राजनाथ यांनी पाकिस्तानवर दया दाखवली. जर पाकिस्तान दहशतवादी विरोधी लढा देण्यात असमर्थ असेल, जर ते दहशतवादी परिस्थिती एकट्याने हाताळू शकत नसतील तर त्यांनी खूशाल भारताकडे मदत मागावी, जर अफगाणिस्तानला तालिबानविरुध्द लढण्यासाठी अमेरिका मदत करू शकते, तर पाकिस्तानला भारत का मदत करू शकणार नाही, असा प्रश्न राजनाथ यांनी उपस्थित केला.

देशाच्या सुरक्षा यंत्रनेवर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “देशात दहशतवाद थांबला असल्याचा दावा मी करू शकणार नाही, परंतु गेल्या साडेचार वर्षांत देशात कोणतीही मोठी दहशतवादी घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जम्मू काश्मीर हा मुद्दा देशाचा अविभाज्य भाग आहे, या भागात सतत दहशतवादी हल्ले होत असतात, इतके असूनसुध्दा जम्मू-काश्मीरमधील पंचायत निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या, यावरून पाकिस्तानने समजून घ्यावे की, भारतात खूप मोठ्या प्रामाणात एकी आहे. पाकिस्तान जम्मू-काश्मीरला जागतिक राजकारणामध्ये घेत आहे, कारण पाकिस्तानकडे कूरघोडी करण्यासाठी दुसरा कोणताच मुद्दा उरलेला नाही, तरीही भारत देश दहशतवादी विरोधी सामना करण्यास सज्ज झाला आहे, अणि येत्या चार ते पाच वर्षांत दहशतवादी संघटनेला समूळ नष्ट करण्यास भारत सक्षम असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More