पांडुरंग फुंडकरांवरील शोकप्रस्ताव दीड तासात गुंडाळला – eNavakal
News अन्य

पांडुरंग फुंडकरांवरील शोकप्रस्ताव दीड तासात गुंडाळला

नागपूर – ज्येष्ठ भाजपा नेते व स्व. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावरील शोकप्रस्ताव आज विधानसभेत अवघ्या दीड तासांत गुंडाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महत्त्वाच्या मंत्रिपदावर असताना फुंडकर यांचे निधन झाले, त्यामुळे शोकप्रस्तावावर जास्त जण बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु शोकप्रस्तावाची निव्वळ औपचारिकता पार पाडली गेल्याचे चित्र सभागृहात दिसल्याने हा आज चर्चेचा विषय ठरला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्येष्ठ भाजपा नेते व स्व. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावरील शोकप्रस्ताव विधानसभेत मांडला.

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, ज्ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे, शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, शेकाप नेते गणपतराव देशमुख, राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांची शोकप्रस्तावावर भाषणे झाली. परंतु एकनाथ खडसे सोडले असता बाकीच्या सदस्यांची भाषणे औपचारिक होती. खडसेंना मात्र भाऊसाहेब फुंडकरांच्या आठवणी सांगताना भरून आले. दहा मिनिटांच्या भाषणात त्यांना दोनदा गहिवरून आले.

फुंडकरांवरील शोकप्रस्ताव मांडण्याआधी सरकारकडून काही अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. एका विधेयकाची पुनर्स्थापना करण्यात आली. यावर आक्षेप घेत अजित पवार यांनी शोकप्रस्ताव असताना कामकाज का घेतले, असा सवाल उपस्थित केला. 2014 साली भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर फुंडकरांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. पण त्यांना मंत्रिपदासाठी वाट पाहावी लागली, असा टोमणाही यावेळी पवार यांनी मारला. फुंडकर राज्याचे कृषिमंत्री होते. त्यांच्या निधनानंतर सरकारने कोणताही दुखवटा जाहीर केला नाही किंवा शासकीय श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित न केल्याने आश्चर्य वाटल्याचे पवार यांनी सभागृहात सांगितले. फुंडकर हे विधान परिषदेचे सदस्य असल्याने विधान परिषदेत मात्र शोकप्रस्ताव बराच वेळ चालला. दरम्यान फुंडकर यांच्यासह माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य आणि माजी आमदार बापूसाहेब पानघटे यांनाही विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More