पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय – eNavakal
News क्रीडा

पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय

नॉर्टिंगहॅम – विराट कोहलीच्या टीम इंडियाने टी-20 मालिकेपाठोपाठ वनडे मालिकेतदेखील जोरदार विजयी सलामी दिली. वनडे मालिकेतील पहिल्या लढतीत टीम इंडियाने यजमान इंग्लंडचा 8 गडी आणि 10 षटके राखून आरामात पराभव केला. 6 बळी घेणारा कुलदीप यादव आणि नाबाद शतकी खेळी करणारा रोहित शर्मा टीम इंडियांच्या विजयाचे शिल्पकार होते. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करून इंग्लंडला मोठी धावसंख्या करू दिली नाही. त्यांचा डाव 268 धावांत आटोपला. स्ट्रोक आणि बटलरने काढलेल्या अर्धशतकांमुळे इंग्लंडला अडीचशे धावांचा टप्पा गाठता आला.

भारतातर्फे फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने सुरेख गोलंदाजी करताना अवघ्या 25 धावांत 6 बळी टिपले, तर उमेश यादवला 2 बळी मिळाले. भारताने विजयी लक्ष्य 41व्या षटकात धवन आणि विराटचे बळी गमावून सहज पार केले. मुंबईकर रोहित शर्माने टी-20 प्रमाणेच पहिल्याच सामन्यात शानदार शतकी खेळी केली. त्याने 114 चेंडू खेळताना 137 धावा केल्या. त्याने कर्णधार विराटसोबत दुसर्‍या विकेटसाठी 167 धावांची भक्कम भागीदारी करून भारताचा विजय निश्चित केला. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने आता 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News देश

अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस, पी.व्ही.सिंधू, मेरी कोम यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार जाहीर केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रेडी मिक्स सिमेंटच्या 12 प्लांटवर कारवाई! ठाणे पालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – ठाण्यातील बेकायदा रेडी मिक्स सिमेंट प्लांटविरोधात ठाणे महापालिकेने मोहीम हाती घेतली असून 18 पैकी 12 प्लांटवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई...
Read More
post-image
News विदेश

कोरोना व्हायरसची जगभरात दहशत! चीनमध्ये 41 जणांचा मृत्यू

दिल्ली – कोरोना व्हायरसची जगभरात दहशत निर्माण झाली आहे. चीनमध्ये सुमारे 41 जणांचा या विषाणूजन्य संसर्गाने मृत्यू झाला आहे. या रोगाचा प्रसार होऊ नये...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवणारे निर्दोष

माणगाव- छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीच्या मागे असलेला वाघ्याचा पुतळा हटवल्याच्या खटल्यात संभाजी ब्रिगेडच्या 73 जणांची माणगाव सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट

कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर आणि श्री जोतिबा मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट (इमारत संरचना पाहणी) लवकर केली जाणार आहे. दोन्ही मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट स्ट्रक्टवेल...
Read More