पहिल्या टप्प्याच्या वेगातच मेट्रोचे निगडीपर्यंतचे काम पुर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

पहिल्या टप्प्याच्या वेगातच मेट्रोचे निगडीपर्यंतचे काम पुर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पिंपरी- पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. मेट्रोचे पिंपरीपर्यंत वेगात काम सुरु आहे. त्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पुर्ण केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आळंदी दौ-यावर होते. त्यावेळी मेट्रोची पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत किती आवश्यकता आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे, याची सविस्तर माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. तसेच पीसीसीएफ या संघटनेच्या पदाधिका-यांची देखील मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याबाबत आमदार महेश लांडगे आणि  पीसीसीएफ या संघटनेच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा केली. मेट्रोचे काम टप्प्यात वगैरे करा, असे काही नाही. निगडीपर्यंत मेट्रो धावली जाणार आहे. आता पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचे काम जेवढ्या वेगात आहे. तेवढ्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पुर्ण केले जाईल. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आमदार महेश लांडगे म्हणाले, निगडीपर्यंत मेट्रो पहिल्याच टप्प्यात नेण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यांनी त्याबाबत ठोस आश्वासन दिले आहे. पिंपरीपर्यंतच्या वेगानेच निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पुर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मेट्रो निगडीपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More