पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय – eNavakal
News क्रीडा

पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय

लंडन – आज चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 5 बाद 110 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. कालची नाबाद जोडी विराट कोहली आणि दिनेश कार्तिकने आज चौथ्या दिवशी आपली फलंदाजी पुढे सुरू केली. जेम्स अ‍ॅँडरसनच्या दिवसातील पहिल्या षटकात यष्टीरक्षक कार्तिकला स्लिपमध्ये मॅलेनने झेलबाद करून इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. कार्तिकने 50 चेंडू खेळताना 2 चौकार मारले आणि 20 धावा केल्या. कार्तिक बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीचा मोठा बळी इंग्लंड संघाला मिळाला. ज्याची इंग्लंड संघ आतुरतेने वाट पाहात होता. पहिल्या डावात शानदार शतकी खेळी करणार्‍या विराटने पुन्हा एकदा झुंजार अर्धशतकी खेळीकेली. पण त्याची झुंजार खेळी भारतीय संघाचा पराभव टाळू शकली नाही. स्टोकने विराटला 51 धावांवर पायचीत करून इंग्लंंडला दुसरे मोठे यश मिळवून दिले. त्याने 93 चेंडू खेळताना 4 चौकार मारले. विराट बाद झाल्यानंतर इंग्लंड संघाने मैदानात विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर आलेल्या शमीला स्टोकने भोपळादेखील फोडू दिला नाही. दुसर्‍या बाजून हार्दिक पांड्या भारताची एक बाजू लावून धरत होता. त्याला तळाच्या शर्मा आणि यादव कडून किती सहकार्य मिळते. यावरच भारताचा विजय अवलंबून होता असे चित्र निर्माण झाले. इशान शर्माला राशीदने 11 धावांवर पायचीत करून भारताला आणखी एक धक्का दिला. तर नंतर आलेल्या यादवने पांड्याला थोडीफार साथ देण्याचा प्रयत्न केला. पण स्टोकने अखेर पांड्यालाच कुकमार्फत 31 धावांवर झेलबाद करून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडतर्फे स्टोकने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर अँडरसन आणि ब्रॉडला प्रत्येकी 2
बळी मिळाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कमलनाथ की ज्योतिरादित्य? गेहलोत की सचिन पायलट? अनुभवी की युवा?

जयपूर – राजस्थानात काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याने आजच सायंकाळी 7 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला. मात्र निवडणूक निकाल...
Read More
post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More