पश्‍चिम बंगालचा प्रचार संपला! शेवटच्या दिवशी सभाच सभा – eNavakal
Uncategoriz

पश्‍चिम बंगालचा प्रचार संपला! शेवटच्या दिवशी सभाच सभा

कोलकाता – जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारी अशा हिंसाचाराने धुमसणार्‍या पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीचा प्रचार आज थांबला. आज शेवटच्या दिवशी भाजपा व तृणमूल काँग्रेसने सभांचा धूमधडाका लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये दोन जाहीर सभा घेतल्या. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तब्बल चार झंझावाती सभा घेतल्या.
निवडणूक आयोगाने पश्‍चिम बंगालमधील गृह खात्याच्या प्रधान सचिवांना आणि सीआयडीच्या अतिरिक्‍त संचालकांना हटविल्याने नरेंद्र मोदींनी आज डायमंड हार्बर व मथुरापूर येथे धूमधडाक्यात सभा घेतल्या. यावेळी मोदींनी बंगालमध्ये तब्बल 17 प्रचार सभा घेतल्या. तर आज शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी चार सभा घेतल्या. मोदींनी सभा घेतलेल्या मथुरापूर व डायमंड हार्बर या मतदारसंघात ममता बॅनर्जी यांनी आज सभा घेतल्या. डायमंड हार्बर येथे ममता बॅनर्जी यांचा भाचा उभा आहे. ममतांनी त्यानंतर जोका आणि सुकंता सेतू येथेही जाहीर प्रचार सभा घेतल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More