पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच! भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह आढळला – eNavakal
देश

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच! भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह आढळला

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये उफाळलेला हिंसाचार दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे.      याबाबत भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. या दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेला आहे. काही दिवसांपासून परिसरात न दिसलेल्या एका भाजपा कार्यकर्त्याचा आज मालदा भागात मृतदेह आढळला आहे त्यामुळे वातावरण आणखी तापले असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जय श्री राम अशा घोषणा दिल्या. या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

यापूर्वी पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात कांकीनारामध्ये गावठी बॉम्ब हल्ल्यात दोघांचा मृत्यू आणि चार जण जखमी झाल्याची घटना घडली होती. ते दोघे आमचे कार्यकर्ते असून, त्यांना भाजपाच्या गुंडांनी ठार मारल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत हिंसाचारामध्ये ठार झालेल्या दहा जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री ममता यांनी दहा लाखांची मदत जाहीर केली.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

राखी सावंत नवऱ्यासोबत येणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई – सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो असलेल्या हिंदी ‘बिग बॉस’चा तेरावा सीजन लवकरच सुरू होणार आहे. यावेळी घरात कोणकोणते कलाकार असणार याबाबत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More