पश्चिम बंगालमध्ये उद्या रात्री १० वाजता प्रचार बंद होणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

पश्चिम बंगालमध्ये उद्या रात्री १० वाजता प्रचार बंद होणार

कोलकाता – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराबाबत निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पश्चिम बंगालमधील परिस्थिती पाहता या टप्प्यातील प्रचार उद्या १६ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंतच सुरू राहील, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. देशातील निवडणूक प्रक्रियेमध्ये पहिल्यांदाच असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या गृह सचिवांना पदावरून हटवून त्यांचा अतिरिक्त पदभार मुख्य सचिवांकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, काल अमित शहांच्या रोड शो दरम्यान झालेल्या मोठ्या दगडफेक आणि जाळपोळीमुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सीआरपीरफचे जवान होते म्हणून पश्चिम बंगालमधून जिवंत बाहेर पडू शकलो, असे म्हणत या हल्ल्याला तृणमूल कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप आज अमित शहांनी केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

ठरलं! ‘चांद्रयान-2’ २२ जुलै रोजी झेपावणार

श्रीहरीकोटा – भारताच्या बहुप्रतिक्षीत ‘चांद्रयान 2’ मोहिमेला १५ जुलै रोजी मध्यरात्री २.५१ वाजता सुरुवात होणार होती. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात...
Read More
post-image
मुंबई

प्रीतम हॉटेलचे मालक कोहलींचे दु:खद निधन

मुंबई – दादरमधील सुप्रसिद्ध प्रीतम हॉटेलचे मालक कुलवंतसिंग कोहली यांचे बुधवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १९९८ मध्ये त्यांना मुंबईचे नगरपाल म्हणून मान देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

अयोध्याप्रकरणी मध्यस्थ समितीला ३१ जुलैपर्यंत अहवाल देण्याचे आदेश

नवी दिल्ली – अयोध्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने आज सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा अहवाल स्वीकारला असून या प्रकरणावर तोडगा...
Read More
post-image
महाराष्ट्र

हुतात्मा समुहाच्या मार्गदर्शिका कुसुमताई यांचे निधन

सांगली – जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समुहाच्या मार्गदर्शिका कुसुमताई नागनाथ नायकवडी (वय 88) यांचे काल रात्री...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे काका सुपरस्टार राजेश खन्ना

‘काका’ अशी ओळख असलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मा. राजेश खन्ना यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. जतीन खन्ना हे राजेश खन्ना यांचे...
Read More