पवारांच्या भेटीनंतर मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

पवारांच्या भेटीनंतर मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावले

नवी दिल्ली – महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील ओल्या दुष्काळाची माहिती आणि अपेक्षित मदत याबाबत त्यांनी मोदींची चर्चा केली. मात्र या नरेंद्र मोदींनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे ही भेट केवळ शेतकरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती की यावेळी राज्यातील सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पंतप्रधान कार्यालयात 45 मिनिटे बैठक झाली. यावेळी पवारांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची माहिती देत केंद्र सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी करणारे सविस्तर पत्र मोदींना दिले. तसेच 31 जानेवारी 2020 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवारांनी मोदींना निमंत्रण दिले आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसरे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. त्यानंतर मंगळवारी मोदी-पवार भेट होणार होती. मात्र ती होऊ न शकल्याने आज ही भेट होणार आहे. दरम्यान, पवारांनी, ‘ज्यांना सर्वाधिक जागा आहेत आणि जे युतीत लढले आहेत, त्यांना सत्तास्थापनेबाबत विचारा’, असे म्हटले होते. त्यामुळे अजून कोणत्याही आघाडीवर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आज झालेल्या पवार-मोदी आणि मोदी-शहा भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More