पवारांच्या बारामतीचे पाणी माढा-फलटणकडे वळविण्याचे आदेश – eNavakal
News महाराष्ट्र

पवारांच्या बारामतीचे पाणी माढा-फलटणकडे वळविण्याचे आदेश

मुंबई – गेली अनेक वर्षे बारामतीला जाणारे नीरा-डाव्या कालव्याचे 60 टक्के पाणी माढा व फलटणकडे वळविण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. हा शरद पवार यांना जोरदार राजकीय दणका आहे.
वर्षानुवर्षे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्यासहीत माळशिरस, माण, खटाव, सांगोला व खंडाळा या तालुक्यांना मिळावे म्हणून सध्याचे माढाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे प्रयत्न करीत होते. त्यासाठीच ते भाजपात गेले होते. त्यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीतून भाजपात आलेले माळशिरसचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील व स्वतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बारामतीचे 60 टक्के पाणी माढ्यासहीत इतर तालुक्यांकडे वळविण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More