पवईत घरफोडी करणार्‍या 4 सुरक्षारक्षकांना अटक – eNavakal
News मुंबई

पवईत घरफोडी करणार्‍या 4 सुरक्षारक्षकांना अटक

मुंबई – पवई येथे एका व्यावसायिकाच्या घरी सुमारे 52 लाख रुपयांची घरफोडीनंतर नेपाळला पळून जाणार्‍या चार सुरक्षारक्षकांना पवई पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. बलबहादूर खडकसिंग बोहरा, लक्ष्मण दलबहादूर लोहार, दिनेश रामसिंग विश्‍वकर्मा आणि प्रेम दलबहादूर लोहार अशी या चौघांची नावे असून ते चौघेही मूळचे नेपाळचे रहिवाशी आहे. अटकेनंतर या चौघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत पाच आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. यातील तक्रारदार केतक जनार्दन सावंत हे व्यवसायाने व्यापारी असून ते काळाचौकी परिसरात राहतात. त्यांची चुलत बहिण रोहिणी विकास कुसकर ही तिच्या पती विकास आणि मुलगी शेफालीसोबत अंधेरीतील मरोळ मिलिटरी रोड, माऊंट व्हयू सोसायटीमध्ये राहते. 1 नोव्हेंबरला कुसकर कुटुंबिय हॉलिडेसाठी दुबई येथे निघून गेले होते. दुसर्‍या दिवशी त्यांचा केतक सावंत यांना फोन आला आणि त्यांच्या घरी घरफोडी झाल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर ते तिथे गेले होते. घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना फ्लॅटची जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करुन सुमारे 52 लाख रुपयांचा ऐवज पळविला होता. त्यात सोन्याचे, हिर्‍याचे 45 लाख 46 हजार रुपयांचे दागिने, एक लाख रुपयांचा अ‍ॅपल कंपनीचा लॅपटॉप, पाच हजाराचा हार्डडिस्क आणि सहा लाख रुपयांची कॅश आदींचा समावेश होता.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More