पर्रिकरांच्या जीवाला धोका गोव्यातून दिल्लीला हलविणार – eNavakal
देश

पर्रिकरांच्या जीवाला धोका गोव्यातून दिल्लीला हलविणार

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना राहुल गांधी भेटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत सावध झाले आहेत. मनोहर पर्रिकर यांनी राफेल विमान खरेदी कराराबाबत आपले तोंड उघडू नये म्हणून त्यांना आता थेट दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. मात्र आधीच कॅन्सरशी झगडत असलेल्या पर्रिकरांना रुग्णालयात ठेवल्यावर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पर्रिकरांना राफेल कराराची इत्यंभूत माहिती असल्यामुळे ते कधीतरी तोंड उघडतील या भीतीने त्यांचा आवाज कायमचा बंद केला जाण्याची शक्यता आहे.

काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी गोवा विधानसभेत जाऊन मनोहर पर्रिकरांची भेट घेतली व त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यानंतर केरळ येथील सभेत राहुल गांधी यांनी सांगितले की, मनोहर पर्रिकर यांचा नवीन राफेल कराराशी काहीही संबंध नाही. या करारात अंबानीला आणण्याचा खेळ पंतप्रधान मोदी यांनी केला. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने मोदी सरकार प्रचंड हादरले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन म्हणून गुरुवारी सकाळी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मनोहर पर्रिकरांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच मनोहर पर्रिकरांना दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात हलविण्याचा निर्णय जाहीर झाला.

मनोहर पर्रिकरांना दिल्लीत नेऊन त्यांच्यावर अद्ययावत उपचार करण्याच्या नावाखाली त्यांना दिल्लीतच पुढील लोकसभा निवडणुकांचे निर्णय लागेपर्यंत ठेवण्यात येईल. मनोहर पर्रिकर यांनी तोंड उघडू नये व राफेल कराराबाबत अवाक्षर काढू नये यासाठी ही सर्व धडपड भाजपा सरकार करीत आहे. मनोहर पर्रिकर हे खूपच डोकेदुखी ठरले तर त्यांचा जीवदेखील घेतला जाऊ शकतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहर ठरला सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्माता

मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांची नुकतीच एक...
Read More