पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी देणार नाही – उद्धव ठाकरे – eNavakal
महाराष्ट्र

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी देणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली. पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत  मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पश्चिम घाट जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत व गावे वगळण्यासंदर्भातील आपली ही भूमिका केंद्र सरकारला स्पष्टपणे कळविण्यात येईल असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले, पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रामधून गावे वगळण्यापूर्वी वनविभागाने आधी त्या गावांचा ड्रोन सर्व्हे करावा, तेथे कुठले वनेतर उपक्रम आहेत याची माहिती घ्यावी व त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा. जी गावे वाघ किंवा इतर वन्यजीवांच्या भ्रमण मार्गामध्ये किंवा वनक्षेत्रात येतात, त्यांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात यावे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पश्चिम घाट जैवविविधतेच्या संरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पश्चिम घाटातील  62 गावांचा ड्रोन सर्व्हे करणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यावेळी वन,उद्योग व खनिकर्म विभागाने सादरीकरणाद्वारे आपली भूमिका मांडली.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पर्यावरण व राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी,पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी देणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद तर १२ हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई – राज्यात आज सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली असून गेल्या २४ तासांत ११४ हजार ४९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ३२६ मृतांची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस सीबीआयला सहकार्य करणार का? आयुक्त म्हणाले…

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआय मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे सीबीआयला मुुंबई पोलीस सहकार्य करणार का असा प्रश्न उपस्थित केला...
Read More
post-image
मुंबई

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय मुंबईत दाखल

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांंतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याने सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण...
Read More
post-image
मुंबई

दिव्यांग महिलांच्या सहाय्याने साकारले लालबागच्या राजाचे मोझॅक पोट्रेट, ३६ हजार फुलांचा वापर

मुंबई – बोरिवलीत राहणाऱ्या कलाकार श्रुतिका शिर्के- घाग यांनी तब्बल ३६ हजार कागदी फुलांचा वापर करून लालबागच्या राजाचे अनोखे मोझॅक पोट्रेट साकारले आहे. ह्यामध्ये ६...
Read More