परामर्ष : संचित आणि समाजमाध्यमे – eNavakal
लेख

परामर्ष : संचित आणि समाजमाध्यमे

सांस्कृतिक संचित कशाला म्हणायचे किंवा या सांस्कृतिक संचिताचा नेमका उपयोग केव्हा होतो. अलिकडच्या काळात वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर काही चित्रविचित्र पोस्ट फिरत असतात. त्यामध्ये भारतीय संस्कृतीच्या मानदंडांची निर्भत्सना करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या समाजमाध्यमांच्या पोस्ट वाचून त्याला विरोध करणारे मजकूर प्रसारित होतात. देशाच्या सांस्कृतिक किंवा राष्ट्रीय मूल्यांविषयी समाजमाध्यमांवरच्या या पोस्ट कशा चुकीच्या आहेत. हे सांगण्याचा प्रयत्न होत राहतो. परंतु दोन्हीकडचा हा प्रकार भ्रांत आणि अशांत मनोवृत्तींनी चालवलेला तो खेळ असतो. आपण फार बुध्दीवादी आहोत. तेव्हा आपण भारतीय संस्कृतीचे फार मोठे संरक्षक आहोत असा भ्रांतपणा या दोघांमध्येही समान पध्दतीने पाहायला मिळतो. जसे अलिकडेच दहीहंडी किंवा जन्माष्टमीच्या निमित्ताने कोणीतरी श्रीकृष्णाच्या जन्माविषयी उलटसुलट तर्क मांडून आपल्या बालबुध्दीचे प्रदर्शन केले. त्याला लगोलग समाजमाध्यमांवर उत्तरही दिले गेले आणि अशा संस्कृतीविरोधी पोस्टपासून सावध राहण्याचा मानभावी सल्लाही दिला गेला. हा सगळा प्रकार पाहून मनामध्ये विचार आला की श्रीकृष्णाविषयी द्वेष करणारे शिशुपाल अजूनही आहेतच पण मथुरेत कंसाकडे चाकरी करून कृष्णाची भक्ती करणारे अक्रूर त्याकाळीही होतेच. दोघांनाही ज्या ज्या वेळी शक्य होईल तेव्हा तेव्हा शिशुपालाने कृष्णाचा द्वेष केला आणि संधी मिळताच अक्रूराने श्रीकृष्णाविषयी प्रेमही व्यक्त केले पण म्हणून श्रीकृष्ण लहानही झाला नाही मोठाही झाला नाही. कारण श्रीकृष्ण हेच ते संचित होते. जे आजही साडेपाच वर्षानंतर टिकून आहे आणि पुढच्या हजारो वर्षे ते टिकूनही राहणार आहे. शंभर अपराध भरले की शिशुपालाचा आपोआप वध होईल. त्याची काळजी करण्याचे काहीच कारण नाही. परंतु असे शिशुपाल लिहीत आहेत म्हणून कृष्णभक्तीचा आव आणणे हेदेखील संयुक्तिक नाही. या दोघांमुळेही ना श्रीकृष्ण नावाच्या संचितावर परिणाम होतो ना श्रीकृष्णाची समर्पित भक्ती करणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सांस्कृतिक संचित म्हणजे काय किंवा सांस्कृतिक संचित कशाला म्हणायचे हा प्रश्न एवढ्यासाठीच उपस्थित केला.

रामायण, महाभारत किंवा या भारतभूमीला लाभलेली समस्त आध्यात्मिक प्रवृत्ती हे ते सांस्कृतिक संचित आहे. समाजमाध्यमांवर काही लिहील्यामुळे ना त्याचे संवर्धन होते ना त्याचे अधःपतन होते. ज्याला खरोखरच या संचिताचे औचित्य ठावूक असेल त्याने आधी या संचिताची शक्ती समजून घेतली पाहिजे आणि त्या शक्तीच्या संवर्धनाची साधी रीतही आत्मसात केली पाहिजे. परंपरेचा हा प्रदीर्घ प्रवाह खंडीत होणारा नाही. आतापर्यंत अनेक आक्रमक आले आणि गेले पण प्रत्येकवेळी याच संचिताने त्या परंपरेला तारलेदेखील. म्हणूनच कोणत्याही समाजमाध्यमांवरच्या पोस्टमुळे भ्रांत किंवा अशांत न होता शक्य तितक्या ताकदीने त्या संचिताला ओळखण्याचा प्रयत्न करावा आणि अगदी केवळ आपल्या कुटुंबात आपल्या मित्रपरिवारात या संचिताचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न करावा. दुर्दैव असे आहे की आज कुटुंबा कुटुंबांमध्येच रामायण, महाभारत, भगवद्गीता यासारख्या संचितांकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. आपण ज्या कुटुंब व्यवस्थेचे प्रभावी माध्यम असतो त्या माध्यमाकडूनच दुर्लक्ष होते त्याचा परिणाम या संचिताविषयी गैरसमज निर्माण करणारा ठरतो. तरीदेखील आज अगदी विज्ञान युगातील तरूणसुध्दा आपला देश, आपला समाज, आपली संस्कृती याविषयी तुलनेने बराच जागरुक असल्याचे पाहायला मिळते. अगदी अमेरिका, इंग्लंड किंवा जपान, फ्रान्ससारख्या देशात गेलेला भारतीय आपल्या या संचिताविषयी खूप स्नेह ठेवून आहे. अगदी अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या फ्रान्सभेटीमध्ये तिथल्या भारतीयांशी संवाद साधला. तेव्हा तिथेसुध्दा गणपती बाप्पा मोरयाचा घोष झाला. सुटाबुटातला आंग्लविद्याविभूषित आणि विज्ञान संगणकाचा हा भक्त आपल्या सांस्कृतिक संचिताविषयी तितकाच आसक्त आहे. कारण कुटुंबाकुटुंबामधून कळत नकळतपणे छोट्या मोठ्या प्रमाणावर याच सांस्कृतिक संचिताचे वेळोवेळी सिंचन होत राहते. रामायण, महाभारताच्या कथा उपकथांमधून हा भारतीय माणूस अभिमंत्रित होत राहतो. अशावेळी समाजमाध्यमांवर बसल्या बसल्या किंवा रिकामटेकडेपणाने श्रीकृष्ण किंवा रामाविषयी कोणी कितीही ओरखडे काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा प्रभाव टिकत नाही. टिकणार नाही. इतकी प्रचंड शक्ती या संचितात आहे. उलट या विज्ञान युगातील वातावरणामुळे लोकांना या संचिताचा अधिकच आधार वाटू लागलेला दिसतो. नियतीने आखून दिलेला आपला कर्ममार्ग आचरत असताना मनाच्या नितळ शांततेसाठी या संचिताच्या स्मरणातून अनेकांना समाधान मिळते. हजारो वर्षे जी गोष्ट टिकून राहिली ती अशा समाजमाध्यमांवरच्या उटपटांग चर्चांमुळे नाहीशी होईल किंवा तिला धक्का पोहचेल या भ्रांत समजूतीतून बाहेर आले पाहिजे किंवा त्याला उत्तर देण्यापेक्षा आपली शक्ती हे संचित समृध्द करण्याच्या कृतींसाठी वापरली पाहिजे. मग प्रत्यक्षपणाने आपापल्या कुटुंबात जरी हे संचिताचे अमृत प्राशन करता आले आणि अशा अनेक कुटुंबांमध्ये त्याचा प्रत्यक्ष म्हणजेच कोणत्याही माध्यमांचा उपयोग न करता संवाद प्रक्रियेतून ते टिकवण्याचा प्रयत्न झाला. तर जास्त फलदायी ठरेल. शंभर कौरवांना पुरून उरणारे पांडव हे याच श्रीकृष्ण नावाच्या संचिताचा परिणाम होता. तर दशानन, दशरथाला दग्ध करणारा एकच राम पुरेसा ठरला. तेव्हा अशा संचितांचे महत्त्व किंवा ताकद अधिक सखोलपणे लक्षात घ्यायला हवी. या भारतभूमीत हजारो वर्षापूर्वी भक्ती हेच एक माध्यम होते. कथा, प्रवचन कीर्तनातून ते समृध्द केले गेले आणि आतादेखील त्याचा प्रभाव जाणवत राहतो. थोडक्यात सांगायचे तर त्याच्या विरोधाला जागाच नाही. ज्याला ते समजते तो हे संचित संवर्धित करतो आणि ज्याला या संचिताची शक्ती उमजते तो ते समृध्द करीत असतो.

  • – लक्ष्मीकांत जोशी
    9930680008

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More