परामर्ष : पुलवामा – प्रतिशोधाचा परिपक्व प्रवास हवा – eNavakal
देश लेख

परामर्ष : पुलवामा – प्रतिशोधाचा परिपक्व प्रवास हवा

पुढचा सगळा काळ हा आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि काश्मिर प्रश्नासंबंधात कायमचा उपायांवर चर्चा करणारा असेल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत दहशतवादाच्याविरोधात ठाम भूमिका  घेताना दिसतो. शिवाय प्रथमच आंतरराष्ट्रीय समुदायसुध्दा भारताच्या बाजूने आणि दहशतवादाच्याविरोधात उभा राहिलेलाही पाहायला मिळतो.पुलवामा येथे सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद या संघटनेने दहशतवादी हल्ला करून भारताचे एकाअर्थाने अपरिमित नुकसान केले. किंबहुना गेल्या पन्नास वर्षात जगातल्या कोणत्याही देशाचे चाळीस जवान कोणत्याही दहशतवादी हल्ल्यात ठार झाल्याचे ऐकिवात किंवा पाहाण्यात नाही. अगदी तालिबान्यांनी किंवा इसिससारख्या दहशतवादी संघटनांनी घातलेल्या थैमानतही एकाचवेळी एकाच देशाचे चाळीस जवान बळी गेल्याचे आढळून येत नाही. म्हणूनच ही घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. भारताने या हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून बालकोट येथे हवाई हल्ले करून तिथल्या दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला. त्यामध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले याचा आकडा अजून समोर आलेला नाही. आणि तो येण्याची शक्यताही दिसत नाही. परंतु भारतीय हवाई दलाच्या अंदाजाप्रमाणे 300 दहशतवादी ठार झाले असण्याची दाट शक्यता आहे. आजच्या क्षणी हा आकडा भारताने किंवा हवाई दलाने जाहीर करणे गरजेचेही नाही. दुर्दैवाने आपल्या देशातील राजकीय पक्षांची बुध्दी ही राजकारणापलिकडे जात नसल्याने राष्ट्रकारणाचे नेहमीच नुकसान होत आले. मग तो सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो. चाळीस जवानांच्या हौतात्म्य द्यावे लागणे ही भारताच्यादृष्टीने अतिशय गंभीर गोष्ट ठरते. त्याच्या राजकीय श्रेयासाठी कोणी धडपड करीत असेल तर त्यांना त्यांच्या या स्वार्थीपणाची जाणीव करून दिलीपाहिजे. क्षणभर आपण विचार करू की आज लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या नसत्या आणि अशा प्रकारच्या घटना घडल्या नसत्या तर या राजकीय पक्षाची भूमिका काय राहिली नसती. कदाचित तेव्हादेखील या ना त्या पध्दतीने त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला असता. मात्र चाळीस सैनिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी ज्या प्रकारचा प्रतिशोध आवश्यक आहे. तो अधिक व्यापक करावा लागला असता.

आज देशात निवडणुकांचा माहोल असल्यामुळे या प्रतिशोधालाही लगाम घालावा लागत आहे. ही एवढी मोठी घटना ठरते. या प्रसंगावरून भारत पाकिस्तानमध्ये पूर्ण स्वरुपात युध्द छेडले गेले असते. चाळीस सैनिक गेल्याचे दुःख या राजकीय पक्षांना तितकेसे वाटत नाही अन्यथा कोणीही या घटनेचे राजकारण केले नसते. कोणीही या हवाई हल्ल्याचे पुरावेही मागितले नसते. उलट एका हवाई हल्ल्याने काम भागणार नाही. आता प्रतिशोधाचा हा प्रवास थेटपर्यंत नेण्याचाच निर्धार व्यक्त व्हायला हवा होता. कारगिल युध्दानंतर  पाकिस्तानने भारताविरुध्द कुरापतीचा प्रयत्न केला. त्यावेळीदेखील भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले गेलेअसले तरीसुध्दा ज्याप्रमाणात जवानांचे हौतात्म्य गेले ती संख्या खूपच अधिक होती. कारगिल युध्दात पाकिस्तानचे तोंड पोळले गेले असले तरी त्याने भारताविरुध्दचे छुपे युध्द चालूच ठेवले आहे. कारण स्वतःच्या जवानांची किंमत न मोजावी लागता दहशतवादांच्या माध्यमातून भारताचे सतत नुकसान करण्याचा पाकिस्तानचा उद्देश सफल होत आलेला आहे. कमी खर्चाचे किंवा कमी नुकसानीचे हे छुपे युध्द पाकिस्तानला परवडत असल्याने ते चालू ठेवण्यातच त्या देशाचे हित साधले जाते. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मिरसारखा विषय सतत जागता ठेवून आपले महत्वही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला आहे. ज्यांच्या जोरावर हे छुपे युध्द खेळले जात आहे. त्याविरोधात अतिशय धोरणीपणाने आणि मुत्सद्देगिरीने उपाय योजण्याची गरज आहे. त्या दृष्टीकोनातूनच भारताने पुलवामा हल्ल्याचा प्रतिशोध घेताना हवाई हल्ल्याचा पर्याय स्वीकारला. आणि लष्करी किंवा नागरी नुकसान न करता दहशतवाद्याची ठिकाणे उध्वस्त करण्यावर भर दिला गेलाआहे. आणि या उपायाचा जागतिक स्तरावर खूपच सकारात्मक परिणाम झाला. छुप्या युध्दाला थेट युध्दाचा पर्याय न वापरता गुप्त हल्ल्यांचा उपाय निवडून भारताने जगाला आपली परिपक्वता दाखवून दिली. यामधून पाकिस्तानला जो काही धडा मिळायचा तो जरी मिळाला असला तरी तो परिपूर्ण नाही याची जाणीव भारताने ठेवली पाहिजे.

पुलवामा प्रकरणानंतर हवाई हल्ल्यांचा पर्याय योग्य होता का इथपासून ते ही समस्या सोडवण्याकरीता असे हल्ले युध्द की राजकीय आणि मुत्सद्देगिरीचे उपाय यापैकी काय योग्य ठरू शकेल याची चर्चाही सुरु झाली आहे. भारतासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की या प्रकरणामुळे जगभर पाकिस्तान हा दहशतवादाचा पोशिंदा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आणि काश्मिर प्रश्न हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा परिपाक आहे. हे सिध्द करण्याकरीता आज भारताकडे ठोस पुरावाही उपलब्ध झाला आहे अशावेळी काश्मिर हा प्रश्नच शिल्लक राहिलेला नाही दहशतवाद हाच मुळ प्रश्न असल्याने त्याचाच नायनाट करण्याकरीता पाकिस्तानवर सर्व प्रकारचा दबाव निर्माण करण्याची हीच नामी संधी आहे. जगालादेखील त्याच पध्दतीने सांगितले गेले पाहिजे. म्हणूनच प्रतिशोधाचा हा प्रवास दहशतवादाचा समुळ अंत होईपर्यंत चालू ठेवावा लागेल. त्याच दिशेने  किंवा त्याच संदर्भामध्ये चर्चा घडवल्या गेल्या पाहिजेत. भारतातल्या राजकीय पक्षांनी जरा परिपक्वता दाखवावी. पुलवामा हल्ला ही पाकिस्तानची केवळ घोडचूक नव्हे तर तो देश आणि तिथल्या प्रवृत्तींची जन्मजात खोड म्हणून लक्षात घ्यावी. आणि ती त्याच पध्दतीने संपवावी.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २६ सप्टेंबरला पुन्हा मुंबईत

मुंबई – महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार असल्याची घोषणा करत भाजपा राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईतील गोरेगाव येथील सभेत विधानसभेच्या प्रचाराचा...
Read More