परळीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाडांची हत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

परळीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाडांची हत्या

बीड – राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. बीडमधील परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली आहे. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

परळी येथील उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. गायकवाड यांची पत्नी मीनाबाई गायकवाड या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या हल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र अंतर्गत वादातून ही हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More