परभणी मनपात काँग्रेसच्या देशमुख यांंचे वर्चस्व – eNavakal
निवडणूक महाराष्ट्र

परभणी मनपात काँग्रेसच्या देशमुख यांंचे वर्चस्व

परभणी – जिल्ह्याच्या राजकारणा मध्ये राष्ट्रवादीचा पाडाव करून काँग्रेसने आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. राष्ट्रवादीला धोबीपछाड करत देशमुख यांनी आपली पकड कायम कायम ठेवली आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील देशमुख यांचे अधिराज्य पुन्हा एकदा सिद्ध झाले. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी सुनील देशमुख यांची बिनविरोध निवड तर वैद्यकीय सहाय्यक व आरोग्य सभापती पदी सचिन देशमुख यांची निवड झाली.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती व आरोग्य समिती सभापतीची निवडणूक 10 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता बी. रघुनाथ सभागृह येथे निर्वाचन अधिकारी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, आयुक्त रमेश पवार ,उपायुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगर सचिव विकास रत्नपारखे, सहाय्यक मुकुंद कुलकर्णी यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली यावेळी राष्ट्रवादीचे सय्यद इमरान हुसेनी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे सुनील जनार्दन देशमुख यांची बिनविरोध निवड झाली तर आरोग्य सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या डॉ. वर्षा संजय खिल्लारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे सचिन मंचकराव देशमुख आरोग्य सभापती पदी निवड झाली. या निवडीनंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर आयुक्त रमेश पवार यांनी स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती व आरोग्य सभापती सचिन देशमुख सत्कार केला. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक अटीतटीची होणार याची शक्यता होती. आणि झालेही तसेच महानगरपालिकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांची एक हाती सत्ता आहे.
माजी आमदार सुरेश देशमुख यांचाही मोठा वाटा येथे आहे. मनपात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न उधळून लावण्यात वरपुडकर व देशमुख वरचढ ठरले आहे.

राष्ट्रवादीला मिळालेला हा दनका आगामी निवडणुकीच्या निमित्ताने बरेच काही शिकण्यासारखा आहे. सचिन देशमुख आणि सुनील देशमुख यांनी जिंकलेली जागा महत्त्वाची असुन हा विजय काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करणारा आहे. निवडणुकीनंतर सभागृहाबाहेर महापौर मीनाताई वरपूडकर उपमहापौर माजूलाला सभागृहनेते भगवान वाघमारे विरोधी पक्षनेते विजय जामकर बालासाहेब बुलबुले आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
लेख

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ साली झाला. अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन...
Read More