परभणीत १ लाख १३ हजार रुपयांची दारु पकडली  – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

परभणीत १ लाख १३ हजार रुपयांची दारु पकडली 

परभणी – गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करत छापे टाकण्यात आले. स्थानिक गुन्हा शाखा, नानलपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ लाख १३ हजार ४४० रुपयांची अवैध दारु जप्त करण्यात आली.

शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून स्थानिक गुन्हा शाखेने शहरातील मराठवाडा प्लॉट, उस्मानियॉ कॉलनी, हडको परिसर, जिंतूर रोडवरील नेहरु नगर या ठिकाणी छापा टाकला. नानलपेठ पोलिसांनी  उस्मानियॉ कॉलनी, खंडोबा बाजार या ठिकाणी ही कारवाई केली. स्थानिक गुन्हा शाखेने ८७ हजार ५६६ तर नानलपेठ पोलिसांनी २५ हजार ८७५ रुपयांची दारु पकडली. तसेच १ अ‍ॉटो आणि एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत आरोपी जयश्री कनकुटे, शेख मेहरुन्नीसा, मिलींद घागरमाळे, परसराम वाकळे, विजय वाकळे, इस्माईल खान, शेख शाहरुख, शेख हाजी, शेख असलम, राजेश वाघमारे, शेख तस्लीमा शेख रजीया, शेख नशो, शेख अक्रम, शेख अजहर, राजेश्वर गावडे, सचिन जाधव, या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आरसीबीच्या पथकाने केली.

शहरातील कोतवाली, ग्रामीण, नवामोंढा पोलिसांनीही अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. कोतवाली पोलिसांनी सातशे रुपये तर नवा मोंढा पोलिसांनी १ हजार १४४ रुपयांची दारु जप्त केली.

◾चारठाण्यात पोलिसांची धडक मोहिम

पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई करत ५ हजार  ६६८ रुपयांची दारु जप्त केली आहे. तीन दारु अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. पेठ विभागातील छाप्यामध्ये देशी दारुच्या ९८ बॉटल तर दुसर्‍या दोन कारवायांमध्ये ५१ देशीच्या बॉटल जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स.पो.नि. अजयकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

(व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन!

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य रेल्वेवर आज ६ तासांचा ‘जम्बो ब्लॉक’

कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक येथील मध्य रेल्वे प्रशासन आज १०४ वर्ष जुना पत्री पूल पाडण्याचे काम हाती घेणार आहे. या जम्बोब्लॉकचे काम आज रविवारी...
Read More