परभणीत शहीद शुभम मुस्तापुरेंवर लष्करी इतमामात दफनविधी – eNavakal
News महाराष्ट्र संरक्षण

परभणीत शहीद शुभम मुस्तापुरेंवर लष्करी इतमामात दफनविधी

परभणी – जम्मू–काश्मीरमध्ये कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात जवान शुभम मुस्तापुरे शहीद झाले. शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांचा कोनेरवाडी येथे लिंगायत समाजाच्या धार्मिक विधीनुसार  दफनविधी करण्यात आला. शुभम यांच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा आणि दोन लहान भावंडे असा परिवार आहे.
शहीद शुभम मुस्तापुरे पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे रहिवासी होते.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही स्वबळावर मेहनत करून ते लष्करात भरती झाले होते. त्यांचे वडील शिवणकाम करतात तर आई अंगणवाडीच्या मुलांसाठी मध्यान भोजन बनवण्याचे काम करतात. त्यांच्या जाण्याने आई वडिलांचा आधार हरवला आहे अशी हळहळ गावकर्यांनी व्यक्त केली.
पूँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवर मंगळवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाक सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि उखळी तोफगोळ्यांचा मारा केला. यात मुस्तापुरेंसह एक अधिकारी व आणखी दोन जवान जखमी झाले. चारही जखमींना उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारांदरम्यान मुस्तापुरे यांचा मृत्यू झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More