परभणीत राज्य शासनाकडून 100 खाटांच्या स्त्री रूग्णालयास विशेष मान्यता – eNavakal
आरोग्य महाराष्ट्र

परभणीत राज्य शासनाकडून 100 खाटांच्या स्त्री रूग्णालयास विशेष मान्यता

परभणी – परभणी जिल्ह्यातील महिला रूग्णांची गैरसोय लक्षात घेता परभणीत नवीन सुसज्ज इमारत बांधकामासाठी राज्य शासनाकडून 100 खाटांच्या स्त्री रूग्णालयास विशेष मान्यता घेतली आहे. या 100 खाटांच्या स्त्री रूग्णालयासाठी आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत एमसीएचव्ही विंग या शिर्षकाखाली 20 कोटी रूपयांचा निधी तात्काळ मंजूर करण्यात आल्याचेही शिवसेनेचे आ.राहुल पाटील यांनी सांगितले.

स्त्री रूग्णालयाची नवीन सुसज्ज इमारत बांधकाम करण्याची अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित होती. तसेच सध्या 60 खाटांचे रूग्णालय जुन्या इमारतीत कार्यान्वित होते. रूग्णांची संख्या वाढत असल्याने जागेच्या अडचणीमुळे स्त्री रूग्णांची मोठी गैरसोय होत होती. विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पाठपुरावा करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जावेद अथर यांच्या मार्फत नवीन प्रशस्त इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. नवीन इमारत बांधण्यासाठी दर्गारोड स्थित पशु संवर्धन विभागाची दोन एकर जागा यापुर्वीच आरोग्य विभागास मिळवून देण्याबाबत आ.डॉ. राहुल पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. आरोग्य विभागाच्या वरीष्ठ स्तरावरून सदर प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी मंत्रालयात दोन ते तीन वेळेस बैठकाही घेण्यात आल्या. आ.डॉ.राहुल पाटील यांनी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्याकडे सदर प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शासनाने आता परभणी येथे 100 खाटांचे स्त्री रूग्णालय नवीन इमारतीच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. सा.बां. विभागाकडून नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाली असल्याने स्त्री रूग्णालयाच्या सुसज्ज इमारत बांधकामाचा मार्ग मेकळा झाला आहे. नागरिकातून या बद्दल कौतुक होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

रोहातील कुंडलिका नदीत बुडून तिघांचा मृत्यू

रायगड – रोहामधील कुंडलिका नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे तिघेजण मुंबईतील असून अक्षय गणगे, महेश जेजुरीकर, परेश जेजुरीकर अशी या...
Read More
post-image
देश

बिहारमध्ये ‘एईएस’ आजाराने ११२ मुलांचा मृत्यू

पाटणा – बिहारमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजाराने कहर केला आहे. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये या आजाराने आतापर्यंत तब्बल ९६ बालकांचा बळी गेला असून गेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More