परभणीत महागठबंधनच्या 56 पिढ्या एकत्र आल्या तरी भगवाच फडकणार – eNavakal
News महाराष्ट्र

परभणीत महागठबंधनच्या 56 पिढ्या एकत्र आल्या तरी भगवाच फडकणार

परभणी – लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येवून महागठबंधन उभे केले आहे. मात्र त्यांच्या 56 पिढ्या जरी शिवसेनेच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरल्या तरी परभणीतून शिवसेनेचा भगवा फडकल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आज स्टेडियम मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, आमच्या भगव्यात जो जोष आहे तो तुमच्या 56 पक्षांच्या फडक्यात नाही. आमच्याकडे जोष आहे मात्र तुमच्याकडे द्वेष आहे. शेन घोटाळा करणार्या राष्ट्रवादीला आता शेतकर्यांचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते स्वतः दरोडेखोर असून तुम्ही इतरांना चोर ठरवणारे कोण? असा सवालही उध्दव ठाकरे यांनी यावेळी विचारला. पवारांचे राजकारण आता संपले आहे. मुख्यमंत्री असतांना अशोक चव्हाण यांनी जवानांचा भूखंड खाल्लयामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना डरपोक म्हटले असून अशा नालायकांच्या हातात सत्ता देणार का? असा सवाल उपस्थित करीत क्रांतीकारकांचा अपमान करणार्यांच्या स्वप्नांचा चुराडा जनता करील असा इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More