परभणीत कर्जास कंटाळून तरुण शेतकर्‍यांची गळफास घेत आत्महत्या – eNavakal
News महाराष्ट्र

परभणीत कर्जास कंटाळून तरुण शेतकर्‍यांची गळफास घेत आत्महत्या

परभणी – पूर्णा तालुक्यातील वझुर येथील एका 24 वर्षीय तरुण शेतकर्‍याने बँकेच्या 50 हजार रुपये कर्जास कंटाळून शेतातील टिनशेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुर्णा तालुक्यातील वझुर येथील दत्ता बाबाराव पवार या तरुण शेतकर्‍याने सततची नापिकी, दुष्काळ व आर्थिक विवंचनेत सापडल्याने हे टोकाचे पाऊस उचलले. मागील काही दिवसांपासून त्याच्या नावे असलेले 50 हजार रुपयांचे युनियन बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विचारात तो असायचा. आज सकाळी नेहमीप्रमाणे तो शेतात काम करण्यासाठी गेला. दत्ता हा घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी त्याची शोधाशोध केली. परंतू तो आढळून न आल्याने शेतात आहे का? हे पाहण्यासाठी गेले असता तो टिनशेडमध्ये पाईपला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तो आढळून आला, अशी माहिती मयताचे नातेवाईक मारोती माणीकराव पवार यांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात दिली. यावरून शेतकरी आत्महत्येची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस जमादार हरिभाऊ शिंदे हे करित आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

भाजपाच्या विजयानंतर मोदींनी अडवाणी, जोशींची घेतली भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची...
Read More