परभणीच्या स्वातंत्र्य सैनिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट – eNavakal
News देश

परभणीच्या स्वातंत्र्य सैनिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट

परभणी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. १०ऑगस्ट रोजी परभणीच्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेतली. जिल्ह्यासह राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परभणी जिल्ह्यातील दोन स्वातंत्र्य सैनिकांना भेटले. त्यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केली. तसेच स्वातंत्र्य काळातील आठवणींना उजाळाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

‘भारत छोडो’ आंदोलन, गोवा मुक्ती, हैद्राबाद मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील १० स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे सन्मान करण्यात आला. क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीत सन्मान झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये स्वातंत्र्य सैनिक डॉ. अवधूतराव डावरे हे परभणी जिल्ह्यातील आहेत. डावरे यांनी १९३८ ते १९४८ पर्यंत झालेल्या विविध आंदोलनात भाग घेतला होता. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सत्याग्रहींना त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच परभणीमध्ये झालेल्या या आंदोलनाचे नियोजन केले. तत्कालीन इंग्रजी शाळा, महाविद्यालयांंमध्ये जनजागृती करून त्यांनी शाळा बंद पाडल्या. विदेशी वस्त्र आणि वस्तूंची होळी केली होती. झेंडा सत्याग्रहातही डावरे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा कारागृहात पोलीस स्टेशनवर तिरंगा ध्वज फडकविला होता. त्यांनी २ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात त्यांनी लोणी कॅम्पमध्ये रझाकारांशी मुकाबला केला होता.

स्वातंत्र्य सैनिक वसंत अंबुरे हे परभणी जिल्ह्याचे आहेत. त्यांचे वडील चंद्रनाथ अंबुरे हे सक्रिय स्वातंत्र्यसैनिक होते. १९४७ मध्ये वसंत अंबुरे यांचे वडील परभणी आणि औरंगाबाद या तुरूंगात होते. त्यावेळी वसंत अंबुरे यांनी भूमिगत राहून स्वातंत्र्य संग्रामाचे कार्य पूर्ण केले. हैद्राबाद मुक्ती संग्रामातही वसंत अंबुरे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

झोपडपट्टीतील शौचालयांच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट! म्हाडाने हात झटकले

मुंबई- मुंबईसह उपनगरातील झोपडपट्ट्यातून म्हाडाच्या देखरेखीखाली बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा पालिकेचा प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने धुडकावला, अशी धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

‘त्या’महिलेचे घरकूल हरवले! प्रधानमंत्री योजनेचा ‘खेळ मांडला’

शहापूर, – प्रधानमंत्री घरकूल योजनेचे 2016/17 या कालावधीतील एकही मस्टर ऑनलाईन भरून सबमिशन न केल्यामुळे नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील 14 लाभार्थ्यांना प्रत्येकी 18 हजार नव्वद रुपयांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसतिगृहांच्या तक्रारींवर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा आरपीआयचा इशारा

क र्जत,- तालुक्यातील विविध शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आरपीआयच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्त यांची भेट घेऊन तक्रार केली. वसतिगृहांच्या कार्यपद्धतीत आठ दिवसात सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे

अमृतसर – रावण दहनापूर्वीचा खळबळजनक व्हिडीओ व्हारल

अमृतसर – अमृतसरमध्ये घडलेल्या ट्रेन अपघातामध्ये ६१ लोकांचा जीव गेला. तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यातच एक खळबळ जनक वृत्त समोर येत...
Read More
post-image
महाराष्ट्र

फटाक्याच्या कारखान्याला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

उस्मानाबाद -उस्त्मानाबादमधील तेरखेडा येथील एका फटाक्याच्या कारखान्यात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. दरम्यान, घटनेवेळी कारखान्यात कोणीही नसल्याने मोठी जिवितहानी टळली. वाशी तालुक्यातील तेरखेडा...
Read More