परदेशी कर्मचाऱ्यांना मुंबईत सर्वाधिक पगार;जगभरातील इतर शहरांना टाकले मागे  – eNavakal
गुरुवार विशेष लेख

परदेशी कर्मचाऱ्यांना मुंबईत सर्वाधिक पगार;जगभरातील इतर शहरांना टाकले मागे 

प्रतिज्ञा पवार -शेटे 
मुंबई भारताची आर्थिक राजधानी… औद्योगिक आणि मनोरंजन क्षेत्राची मोठी उलाढाल इथेच होते. अशा या भारताच्या महत्वपूर्ण शहराचे नाव आणखी एका कारणासाठी जगात अग्रेसर ठरले आहे. मुंबईमध्ये काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्या बाबतीत मुंबई शहर जगभरातील शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. एचएसबीसी बँक इंटरनॅशनल लिमिटेडने घेतलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे.हा सर्वे जगभरातील ५२ शहरांमधील २७,५८७ कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीवर घेण्यात आला.
जगातील इतर शहरांमध्ये परदेशी कर्मचाऱ्यांना प्रति वर्ष (पर इयर) देण्यात येणारे वेतन सरासरी ६४,७८,७०९ इतके आहे मात्र मुंबई शहरामध्ये परदेशी कर्मचाऱ्यांना प्रति वर्ष (पर इयर)  १,४०,००,०००  इतके वेतन दिले जाते. म्हणजे मुंबईमध्ये काम करत असताना जवळ जवळ दुप्पट वेतन मिळणे हा मुंबईमध्ये काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांसाठी मोठाच लाभ आहे.तर सॅन फ्रान्सिस्को वेतनाबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे १,३४,००,००० वेतन दिले जात आहे.  याचे कारण अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सिलिकॉन व्हॅली असून फेसबुक या सोशल नेट्वर्किंग साईटचे येथे मध्यवर्ती कार्यालय आहे. याच बरोबर अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहेत.
इतर आशियायी देशांमधील शहरांपैकी परदेशी कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देणाऱ्या टॉप दहा शहरांच्या यादीत शांघाय,जकार्ता,हॉंगकॉंग या शहरांचा समावेश आहे.आशियायी शहरांमध्ये परदेशी कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळत आहे याउलट अमेरिका आणि इंग्लंडमधील लंडन,न्यूयॉर्क,बर्मिंगहॅम अशा मोठ्या शहरांमध्ये मुंबईपेक्षा,परदेशी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणारे वेतन कमी आहे असे एचएसबीसीच्या सर्व्हेमध्ये  उघड झाले आहे.
अमेरिका आणि लंडनमधील फायनान्शियल आणि टेक्नॉलॉजी हबमध्ये नोकरी करण्यास जगभरातील तरुण उत्सुक असतात. कारण येथे काम करणे तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या करियरसाठी अतिशय फायद्याचे ठरते. युरोपमधील टेक सेंटर असलेले डब्लिन शहरदेखील नोकरी करण्यासाठी जगभरातील टॉप ५ शहरांच्या यादीत आहे. मात्र येथे देखील ग्लोबल एव्हरेजपेक्षा कमी वेतन दिले जाते. भारतातील हजारो तरुण अमेरिकेतील आयटी कंपन्यांमध्ये तसेच अन्यत्र नोकऱ्या करीत आहेत. अनेकांचे वार्षिक उत्पन्न ६0 हजार डॉलर्स वा त्याहून अधिक असले तरी ते १ लाख डॉलर्सच्या आतच आहे.
स्विझर्लंड या देशातील झुरिच आणि जिनिव्हा ही दोन शहरे सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांच्या यादीत आहेत. झुरिच या शहरात क्रेडिट स्युसे आणि यूबीएस अशा नामवंत वित्तीय संस्था आहेत. झुरिच सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर जिनिव्हा शहरात ट्राफिग्युरा ही शेअर ब्रोकिंग कंपनी आणि मर्क्युरीया एनर्जी  ग्रुप या कंपन्या असून हे शहर  सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
मुंबईमध्ये परदेशी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन जागतिक वेतन सरासरीपेक्षा दुप्पट (वेतन डॉलरमध्ये) 
 
मुंबई २,१७,१६५
सॅन फ्रान्सिस्को
२,०७,२२७
झुरिच
 २,०६,८७५
शांघाय
२,०२,२११
जिनिव्हा
१,८४,९४२
न्यूयॉर्क
 १,८२,२४०
लॉस अँजिलिस
१,६१,१२६
जकार्ता
१,५२,५८९
हॉंगकॉंग
१,४८,४१९
पॅरिस
१,३९,६०२
जागतिक वेतन सरासरी
 ९९,९०३

स्विझर्लंडमध्ये व्यक्तिगत खर्च बराच जास्त असतो,मात्र देशातील या शहरात उत्पन्न जास्त आणि वैयक्तिक कर कमी भरावयास लागत असल्यामुळे घरभाडे जास्त असूनही जास्त वेतनाचा फायदा घेत कर्मचारी स्वतःच्या देशापेक्षा इथे जास्त आरामात राहत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – अमित शहा

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केला. देवेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More
post-image
देश

भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

नवी दिल्ली – आज ‘लँडर विक्रम’च्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस होता. मात्र लँडर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही. उरली सुरली आशा संपल्यावर इस्त्रो’चे प्रमुख डॉ....
Read More