‘पबजी’ला टक्कर द्यायला आलाय ‘नवा गेम’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या तंत्रज्ञान देश

‘पबजी’ला टक्कर द्यायला आलाय ‘नवा गेम’

मुंबई – सध्या तरुणाईमध्ये पबजी (PUBG) या गेमने इतकी भुरळ घातलीय की, तहान-भूक विसरून अनेक जण या गेमच्या आहारी गेले आहेत. ‘PUBG’ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आता एक नवा गेम आणला आहे. सर्व्हायव्हल (Survival) असं या गेमचं नाव असून एमआयच्या स्टोरवर हा गेम उपलब्ध आहे. शाओमीचा सर्व्हायव्हल गेम (Survival Game) १८५ एमबीचा आहे.

‘Survival Game’ हा PUBG सारखाच एक नवा गेम आहे. सर्व्हायव्हल गेम एका युद्धाच्या मैदानावर आधारीत असून या गेममध्ये मॅप एरियाट स्पेसशिपच्या माध्यमातून उड्डाण करत प्रारंभ होतो. पबजीप्रमाणे या गेममध्येही प्लेअर त्याला हव्या त्या ठिकाणी उतरून शस्त्रांसह अन्य बाबींचा शोध घेऊ शकतो. भारतीयांसाठी खास हा गेम बनवण्यात आल्याचे शाओमी कंपनीने म्हटले आहे. शेवटपर्यंत या गेममध्ये जिवंत राहणाऱ्या प्लेअरला विजेता घोषित करण्यात येते. Survival या गेममध्ये PUBG प्रमाणेच अनेक गोष्टी देण्यात आल्या आहेत. मॅपपासून गनपर्यंतचे सगळे फीचर्स हे सारखेच आहेत. अनेक युजर्सना शाओमीचा हा गेम आवडला आहे. त्यामुळे पबजीला हा गेम खऱ्या अर्थाने टक्कर देऊ शकणार का, हे तर येणारा काळच ठरवणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More