पनवेल महापालिका हद्दीत लॉकडाउन घोषित करावा, विरोधी पक्षनेत्याची मागणी – eNavakal
महाराष्ट्र

पनवेल महापालिका हद्दीत लॉकडाउन घोषित करावा, विरोधी पक्षनेत्याची मागणी

पनवेल – पनवेल महानगरपालिका हद्दीत सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या पाहता पनवेलमध्ये कडक लॉक डाउन जारी करावा अशी मागणी विरोधी पक्षनेता प्रितम म्हात्रे यांनी महापालिकेला केली आहे. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे देखील प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्याची मागणी केलेली आहे.

पनवेल महानगरपालिका विभागात काही आठवड्यांनपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरदिवशी शंभरीच्या आसपास कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीत लॉकडाऊन करण्यात यावे अशी मागणी आता महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

कॉरोनाकाळातही नागरिक सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. आता बाजारातही अशी अधिक गर्दी होत आहे आणि त्यातच वाहनांची वर्दळ देखील वाढली असल्याने वाहतूक कोंडी देखिल सतावू लागली आहे. तसेच आता वेगवेगळ्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागलेला आहे. आता त्यामुळेच महानगरपालिका हद्दीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यावेळी लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या २० ते २५ च्या घरात होती. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ग्रामीणभाग आणि शहरी भागात झपाट्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. पण याला आता कुठेतरी आळा बसावा व कोरोना रुग्णांची ही साखळी तुटावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने किमान आठ दिवसांसाठी तरी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे ई-मेल द्वारे केलेली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

वयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर

पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

भारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत  ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे...
Read More