पनवेल न्यायालय कामकाजप्रकरणी; वित्त, उच्चस्तरीय समिती व मंत्री मंडळाची मान्यता घेणार- मुख्यमंत्री – eNavakal
न्यायालय मुंबई राजकीय

पनवेल न्यायालय कामकाजप्रकरणी; वित्त, उच्चस्तरीय समिती व मंत्री मंडळाची मान्यता घेणार- मुख्यमंत्री

पनवेल- पनवेल येथे नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरु करण्यासाठी तीन महिन्याच्या आत वित्त विभाग, उच्चस्तरीय सचिव समिती व मंत्री मंडळाची मान्यता घेणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताना लवकरच पनवेलमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाजाला सुरुवात होणार आहे.

पनवेल शहरामध्ये अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयासाठी २०१६ मध्ये इमारत पूर्ण झालेले आहे. तसेच त्यासंदर्भात प्रस्तावाची परिपूर्ण माहिती जून २०१७ मध्ये शासनाकडे पाठविण्यात आलेली आहे. त्यांनतर याठिकाणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरु व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे त्या ठिकाणी जनता व वकील यांच्या मागण्या होत्या. पनवेल येथे सध्या दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ स्तरावरचे कामकाज सुरु आहे. मात्र येथे जिल्हा न्यायालयाची इमारत पूर्ण झाली असतानाही येथील जिल्हा न्यायालयाला शासनाच्या न्याय विभागाकडून मान्यता न मिळाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र  जिल्हा न्यायालय सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत व खालापूर येथील नागरिकांना व वकिलांना अलिबागला जावे लागते व त्याकारणाने त्यांचा वेळ वाया जात असून पैशाचा नाहक भुर्दंडही त्यांना सोसावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करता पनवेल येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज लवकरात लवकर सुरु होण्याची गरज आहे, त्या अनुषंगाने वित्त विभाग, उच्चस्तरीय सचिव समिती व मंत्री मंडळाची मान्यता तीन महिन्याच्या आत शासन घेणार का असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर विधिमंडळात उपस्थित केला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरु करण्यासाठी तीन महिन्याच्या आत वित्त विभाग, उच्चस्तरीय सचिव समिती व मंत्री मंडळाची मान्यता घेणार असल्याचे सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा आज मुंबईत राज्यव्यापी मोर्चा

मुंबई – केंद्र सरकारने 2011 मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात 1500 व 750 रुपयांची वाढ केली होती. त्या अगोदर 2008 मध्ये 500 व 250 रुपयांची...
Read More
post-image
विदेश

ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान

लंडन – ब्रिटनच्या संसदेत उद्या मंगळवारी ‘ब्रेक्झिट’ करारावर मतदान होणार आहे. हा करार संसदेने फेटाळला तर देशावर मोठे संकट ओढवेल आणि सार्वत्रिक निवडणुका घेण्याची...
Read More
post-image
मुंबई

बेस्टचा बँकांत खडखडाट टाटासाठी 10 टक्के कर्ज काढले

मुंबई – दिवाळी सणासाठी बोनस म्हणून बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले होते. दिवाळी उलटून आताशा ख्रिसमस जवळ आला तरी महाव्यवस्थापकांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

डोंबिवलीच्या भोपर गावात पाणीबाणी

डोंबिवली – डोबिवली पूर्वेच्या भोपर गाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.114 मध्ये असणार्‍या भोपर...
Read More
post-image
News मुंबई

धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ

मुंबई  – मुंबई पालिकेने आता आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसा प्रस्ताव तयार करून...
Read More