पनवेल आयुक्तांची अखेर बदली, आयुक्तपदी नांदेडचे गणेश देशमुख – eNavakal
News मुंबई

पनवेल आयुक्तांची अखेर बदली, आयुक्तपदी नांदेडचे गणेश देशमुख

मुंबई- राज्य शासनाने राज्यातील 25 वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे चर्चेत असलेले पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली पनवेल मनपा आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर डॉ.एस.एल.माळी यांना नांदेड मनपाच्या आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचे जि.प.सीईओ मधुकर आरदड यांना नगर मनपा आयुक्तपदी पाठविण्यात आले आहे. जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे मुंबई शहराचे जिल्हाधिकारी म्हणून तसेच बुलढाणाचे जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना पुणे मनपा आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लक्ष्मीनारायण मिश्रा यांना वाशिमचे जिल्हाधिकारी तर वाशिम येथील जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांना नगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणार्‍या व्यक्तीला चाकूने भोसकले

मुंबई- विक्रोळी येथे भांडणात मध्यस्थी करणे एका 39 वर्षांच्या व्यक्तीला चांगलेच महागात पडले. मध्यस्थी करणार्‍या या व्यक्तीला तरुणानेच चाकूने भोसकले. त्यात फिरोज नियास खान हा...
Read More
post-image
News मुंबई

ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा महसूल बुडविणार्‍या 11 जणांना अटक! कॅशसहित इतर मुद्देमाल जप्त

मुंबई- ऑनलाईन लॉटरीद्वारे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणार्‍या अकरा जणांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सात ठिकाणी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई करून एक लाख...
Read More
post-image
News देश निवडणूक

मध्य प्रदेशचे कमलनाथ नवे मुख्यमंत्री

भोपाळ – विधानसभा निवडणुकांत यश मिळवल्यानंतर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आज दिवसभर जोर बैठका...
Read More
post-image
News देश

योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगावी-अखिलेश यादव

लखनऊ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण...
Read More
post-image
News मुंबई

ईदला ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन! लाऊडस्पीकरचा आवाज वाढला

मुंबई -ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी न्यायालयाने आदेश देवूनही राज्यात ध्वनिप्रदूषण होत असताना तक्रार देऊनही राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने उच्च न्यायालयाने आज तीव्र...
Read More