‘पद्मावती’ विरोधात हिंसक वळण नाहरगड किल्ल्यावर लटकलेला मृतदेह – eNavakal
गुन्हे देश मनोरंजन

‘पद्मावती’ विरोधात हिंसक वळण नाहरगड किल्ल्यावर लटकलेला मृतदेह

जयपूर
‘पद्मावती’च्या विरोधाने आता हिंसक रूप घेतले आहे. जयपूरच्या नाहरगड किल्ल्यावर आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाशेजारी भिंतीवर कोळशाने लिहिले आहे की, ‘आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही.’
या मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव चेतन शर्मा असे सांगण्यात आले आहे. तो शास्त्रीनगरचा रहिवासी आहे. तसेच या मृतदेहाशेजारच्या भिंतीवर चेतन तांत्रिक असे लिहिले आहे. असे म्हटले जाते की, चेतन तांत्रिक हा राजा रतन सिंहच्या दरबारात होता आणि तिथून हाकलल्यानंतर तो अल्लाऊद्दीन खिलजीला जाऊन भेटला. त्यानेच खिलजीला पद्मावतीबाबत सांगितले होते. दुसरीकडे ‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात या तरुणाने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. परंतु त्याने खरंच आत्महत्या केली की त्याला मारून लटकवण्यात आले, याचा तपास सुरू आहे. तर तरुणाची हत्या दुसर्‍या उद्देशाने केली असावी आणि त्यानंतर या प्रकरणाला पद्मावती वादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात असावा, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
राजपूत करणी सेनेचे महिपाल सिंह यांनी मात्र या घटनेशी आपल्या संघटनेचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. ‘आंदोलन करण्याची ही आमची पद्धत नाही. अशा प्रकारच्या आंदोलकांना लोकांनीही पाठिंबा देऊ नये, असे महिपाल सिंह यांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More