यापुढे मला मार खाणारे नव्हे तर मार देणारे कार्यकर्ते हवेत, राज ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना खडसावले – eNavakal
मुंबई राजकीय

यापुढे मला मार खाणारे नव्हे तर मार देणारे कार्यकर्ते हवेत, राज ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना खडसावले

मुंबई – विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी कुष्णकुंजवर विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली. मला मार खाणारे नको, तर मार देणारे कार्यकर्ते हवे आहेत, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकार्‍यांना खडसावले. फेरीवालाविरोधात आणि मराठी भाषेच्या समर्थनार्थ आंदोलन करताना पक्षाच्या पदाधिकार्‍यांना विरोधी गटाकडून होत असलेल्या मारहाणीबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना विरोधी गटाकडून मार मिळाल्याची गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. महिनाभरापूर्वी मालाडमध्ये विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला होता.
आंदोलनांमध्ये मला मार खाणारे नाहीत, तर मार देणारे कार्यकर्ते अपेक्षित असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी नुकतीच व्यक्त केली होती. येत्या शुक्रवारी अनधिकृत फेरीवाला प्रकरणात मनसे पदाधिकार्‍यांना न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पत्र दिले जाणार आहे. ते पत्र स्थानिक महापालिका आणि पोलीस अधिकार्‍यांना देऊन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज यांनी दिल्या आहेत. काल मनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम, विनोद शिंदे आणि उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळे यांच्यावर तेथील फेरीवाल्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मनसे पदाधिकारी गंभीर जखली झाले. काल मध्यरात्री 2 वाजता अमित ठाकरे आणि मनसे नेता नितिन सरदेसाई यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More