पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. अशात शनिवारी खबळबळ उडवून देणारी घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रुपाली पाटील यांना फोनवरून धमकी देण्यात आली असून, धमकी देणारी व्यक्ती साताऱ्यातील आहे. याप्रकरणी पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच मतदारसंघात प्रचार रंगू लागला आहे. पुण्यातही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, या जागेच्या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड, तर मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सातारा येथील लबाडे आडनाव असलेल्या व्यक्तीनं पाटील यांना धमकी दिली आहे. आरोपींनं फोन करून ‘तू जिथे असशील तिथे संपवू टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस,’ अशी धमकी दिली आहे. या धमकीच्या फोननंतर रूपाली पाटील यांनी पोलिसांत धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार दिली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. अशात शनिवारी खबळबळ उडवून देणारी घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक! दोघांना अटक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी तुटलेल्या काचेच्या भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक केल्याप्रकरणी नांदेड व उत्तरप्रदेश येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी मोठ्या शिताफीने अटक केली.त्यांच्याकडून तब्बल...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

कराचीसुद्धा अखंड भारताचा भाग असेल, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

नवी दिल्ली -एक दिवस कराचीसुद्धा अखंड भारताचा भाग असेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच, त्यांनी अखंड भारत या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

जुन्नर तालुक्यातील गाडलेल्या ४ लेणी समुहांचा शोध

नारायणगाव *  जुन्नर तालुक्यातील पाडळी येथील डोंगररांगांत  नवीन ४ लेणी समुहांचा शोध लागल्याची माहिती माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांनी दिली.असून हे चारही...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

धक्कादायक! मुंबईत ३ वर्षीय चिमुरडीवर दोन अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

मुंबई – मुंबईत एका चिमुकलीवर २ अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घ़टना उजेडात आली आहे. देशभर विविध ठिकाणाहून बलात्काराच्या बातम्या येत असताना मुंबईतील...
Read More