पत्नीच्या पद्मावत चित्रपट पाहण्याच्या हट्टापाई पतीने मागितले संरक्षण – eNavakal
News देश मनोरंजन

पत्नीच्या पद्मावत चित्रपट पाहण्याच्या हट्टापाई पतीने मागितले संरक्षण

गाझियाबाद – गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भवऱ्यात सापडलेला पद्मावती चित्रपट प्रदर्शित होत आहे. नेमकी या चित्रपटावर आक्षेप घेण्यासारखे काय आहे ज्यामुळे चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. हे बघण्यासाठी एका पत्नीने आपल्या पतीकडे ‘पद्मावत’ चित्रपट पाहण्याचा हट्ट केला आहे. पण करणी सेनेने चित्रपटगृह फोडण्याचा दम दिल्यामुळे पत्नीच्या या मागणीमुळे पती चांगलाच घाबरलेला असून त्याला घाम फुटला आहे. दरम्यान त्याने त्याच्या बायकोचा हट्ट पूर्ण करण्यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठले आहे.यात पोलिसांना ट्विट करत पतीने सुरक्षेची हमी मागितली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या वतीने देखील सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.

गाझियाबादमधील संदीप सिंह यांनी सोमवारी गाझियाबाद पोलिसांना एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, माझी पत्नी पद्मावत चित्रपट पाहण्याचा हट्ट करत आहे. चित्रपट पाहायला गेल्यास माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची हमी गाझियाबाद पोलीस देऊ शकते का ?’. गाझियाबाद पोलिसांनी संदीप सिंह यांच्या ट्विटला उत्तरही दिले. तुम्ही निर्भीड होऊन सिनेमा बघायला जा. पोलीस तुम्हाला सुरक्षा पुरवेल,असे आश्वासन पोलिसांनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More