पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक व कोठडी – eNavakal
गुन्हे मुंबई

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक व कोठडी

मुंबई – पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी तेजस रमेश बाकडे या आरोपी पतीला शनिवारी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भायखळा येथे रविंद्र केशव नेवगे हे राहत असून त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. वृषाली ही त्यांची बहिण आहे. तिचे सहा वर्षापूर्वी तेजससोबत विवाह झाला होता. या दोघांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. सध्या वृषाली ही एका खाजगी एनजीओ संस्थेत काम करीत असून तेजस हा काहीच कामंधदा करीत नव्हता. त्यातच त्याला दारु पिण्याचे व्यसन लागले होते. नेहमी बारमध्ये बारबालांवर तो पैशांची उधळपट्टी करीत होता. याच कारणावरुन वृषाली आणि तेजस यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. पतीकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक त्रासाला वृषाली ही कंटाळून गेली होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने 8 नोव्हेंबरला आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी रविंद्र नेवगे यांच्या तक्रारीवरुन आग्रीपाडा पोलिसांनी तेजस बाकडे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी पतीला शनिवारी अटक केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

साईच्या चरणी विक्रमी दान

शिर्डी – शिर्डीत साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या 4 दिवसांमध्ये भाविकांनी तब्बल 5 कोटी 96 लाखांचे विक्रमी दान अर्पण केले आहे. या सोहळ्याला तीन लाख...
Read More